पाचल येथील महिलेला ग्रामीण रुग्णालय रायपाटणच्या वैद्यकिय अधिकाऱ्यानी दिले जीवनदान ! "परिसरातुन वैद्यकिय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव"



 पाचल लोकनिर्माण प्रतिनिधी 

राजापूर तालुक्यातील पूर्व परीसरातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी एक अनोखी घटना घडली,ह्रदय बंद पडलेल्या पाचल मधील ४५ वर्षीय महिलेला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफने तात्काळ उपचारांना सुरवात केली. ह्रदय प्रक्रीया पूर्ववत सुरु करण्यासाठी पम्पिंग प्रक्रीया सुरु झाली.. आणि काय चमत्कार..  काही क्षणात त्या महिलेच्या बंद पडलेल्या ह्रदयाची प्रक्रीया पूर्ववत सुरु झाली.आणि तिला जीवनदान मिळाले. 

वैद्यकीय क्षेत्राचा विजय झाला..ही वार्ता हाहा म्हणता संपूर्ण परीसरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांनी रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि त्याचे ड्युटीवरील कर्मचारी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला.

तालुक्याच्या पूर्व परीसरातील सुमारे साठ ते सत्तर गावांसाठी रायपाटण येथे ग्रामीण रुग्णालय मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून राजापूर शहरानंतर तालुक्यात असलेले आणि ग्रामीण परीसरासाठी असलेले एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. 

  मागील काही वर्षात या रुग्णालयाचा पूर्व तालुक्याला चांगला उपयोग झाला आहे. ग्रामीण परीसराला सर्वात जास्त उपद्रवी ठरत असलेल्या विंचू दंश,सर्पदंशा सारख्या घटनांवर या रुग्णालयात यशस्वी उपचार झाले आहेत . एक-दोन वेळा तर जीव घेणे प्रसंग उद्भभवले होते.

मात्र त्यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्पदंशाने बाधित रुग्णावर यशस्वी उपचार करून त्यांना धोक्याबाहेर काढल्याच्या घटना घडल्या होत्या.आजदेखील त्या सर्वांच्या चांगल्याच स्मरणात आहेत . अन्य  दर्जेदार उपचार देखील या रुग्णालयात होत असतात.

   शनिवारी पाचल मधील वहिदा प्रभूलकर या ४५ वर्षीय  अत्यावस्थ महिलेला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.. तिची स्थिती अत्यन्त नाजूक बनली होती.समोर आलेल्या माहितीनुसार तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी तिच्या ह्रदयाची स्पंदने जवळजवळ बंद झाली होती. मागील काही दिवस रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दर्जेदार उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूर्यकुमार पंदेरीकर आणि रुग्णालयात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रसंग ओळखुन तात्काळ उपचारांना सुरवात केली. बंद पडलेली ह्रदय प्रक्रीया पूर्ववत सुरु करण्यासाठी पम्पिंग उपचार सेवा सुरु केली. आणि चमत्कार घडला. ती महिला सुरु केलेल्या उपचारांना प्रतिसाद देऊ लागली. हळूहळू तिची हदय प्रक्रीया पूर्ववत सुरु झाली. 

 दर्जेदार उपचार करून रायपाटण मधील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला धोक्याबाहेर काढताना तिचा जीव वाचवला. ही वार्ता हा

हा म्हणता पूर्ण परीसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर अनेकांनी रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी,सर्व कर्मचारी यांचे जोरदार कौतुक केले.

रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंदेरीकर, कर्मचारी सायली शिंदे, यशश्री कारेकर, प्रतीक्षा दाते, वेदांत कोटकर,अक्षय नादकुळे,श्रीमती तेरवणकर, समीर बारस्कर आणि सर्व स्टाफ यांच्यामुळे एका महिलेला जीवनदान मिळाले. रायपाटण गावचे सरपंच निलेश चांदे व त्यांचे सहकारी तसेच समस्त ग्रामस्थांनी डॉ पंदेरीकर आणि त्याचे कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे..

आपल्यासमोर कधीही कोणत्या अवस्थेत collapse होऊ शकतो त्यावेळेला जर आपल्या सी.पी.आर ट्रेनिंग अवगत असेल तर आपण अशा व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो हे ह्या घटनेने सिद्ध होत आहे.

तर सी.पी.आर.प्रशिक्षण जास्तीत जास्त लोकांनी शिकून घेण्यात यावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राम मिस्त्री यांनी यावेळी केले आहे.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image