*- सं - पा - द - की - य -* *लॉकडाऊनची आवश्यकता

 


जगभर कोरोनाची दहशत फैलावत आता सर्व देशाची 'भुतो ना भविष्यतो' अशी अवस्था  झाली आहे. जगभरात प्रगत राष्ट्र असणार्‍या अमेरीका, इटली, स्पेन, इराणची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. ज्या देशातून हा संसंर्ग झाला तो चीन आता मोकळा श्‍वास घेऊन मात्र बाकीचे देश गुदमरत चालले आहेत. मात्र दुसर्‍या क्रमांकाच्या लोकसंख्येत असलेल्या भारताला आता या संसर्गाची लागन होऊन देशभरात ९०० हून अधिक बाधित झालेले आहेत. इतर देशातील मृत्यूच्या तुलनेत लोकसंख्येचा दुसरा क्रमांक असलेला भारत मात्र सर्वात कमी मृत्यूदरात असलेला देश आहे. याचे कारण पंतप्रधानांनी दुसर्‍या स्टेजवर असलेला कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात  काही दिवसाच्या लॉकडाऊननंतर आता २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. दिड महिन्यापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या १०० होती. मात्र त्यानंतर  दहा दिवसात ही संख्या  ९०० वर गेली आहे  ज्या वेगाने हा विषाणू भारतात पसरत आहे. त्याच परिस्थीतीनुसार हा संसर्ग तसाच राहिला तर १५ मे पर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १३ लाखापर्यंत जावू शकते. असा अंदाज *कोवीद- १९* यामधील पथकात  काम करणार्‍या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी व्यक्‍त केला आहे. या पथकात भारतीय शास्त्रज्ञही काम करत आहेत.
         कोरोनावर जगात चिन सोडून कोणत्याही देशाकडे उपाय नसल्याने *क्‍वारंटाईड* सारखा उपाय सर्वात चांगला आहे. म्हणून या क्‍वारंटाईडसाठी प्रत्येक नागरिक  हा काम धंदा बंद करुन घरीच बसला तर आपण कोरोनापासून वाचू शकतो. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केलेले आहे. भविष्यात हा संसर्ग जर मोठ्याप्रमाणात पसरत गेला तर त्यासाठी पाहिजे तितकी यंत्रणा आणि  उपाययोजना आपल्या देशात नाही. आणि याच दिवसात कोरोनावर भारत सरकार   उपाययोजना करु शकतो. लोकसंखेच्या प्रमाणात सध्या रुग्णालये कमी प्रमाणात आहेत. ती बंद असल्यामुळे शाळा, कॉलेज, मेडीकल कॉलेज, हॉस्टेल्स, शासनाने जप्त केलेेल्या इमारती यामध्ये अशी तात्पूरत्या स्वरुपात रुग्णालयाची निर्मिती केल्यास लाखो रुग्णांची व्यवस्था होऊ शकते! त्यासाठी नर्सिंग काॅलेज, पॅरामेडीकल काॅलेज येथील विद्यार्थी यांचा याकामी सहभाग घेण्यास भाग पाडून या संसर्गावर मात होऊ शकते!
       आता भारतात लॉकडाऊन केल्यानंतर संचारबंदी लागू केली आहे. त्यात अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सर्वांवर निर्बंध आणले आहेत. मात्र या अत्यावश्यक सेवेचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत. वाटेल त्या चढ्या भावाने किराणा आणि भाजीपाला विकत आहेत. त्यामूळे हातावर पोट असणार्‍यांचे काय होणार असा प्रश्‍न आहे. शासनाने यासाठी आपले कर्तव्यदक्ष अधिकारी नेमून लक्ष ठेवून अशा चढ्या भावाने विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना लगाम घातला गेला पाहिजे. आज कदाचित परिस्थितीत सुधारणा न झाल्यास शासनाच्या गोदामात असणारा  अन्न धान्याचा साठा, भाजीपाला, अॊषधे ही जनतेच्या मागणीनुसार   प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जावून वाटप केल्यास पंतप्रधानांनी जनतेला केलेल्या *लक्ष्मणरेषा* या आवाहनाचा  नक्‍कीच फायदा होऊन कोरोनाला नियंत्रणात आणण्यास मदत मिळू शकते. यासाठी प्रत्येक नागरिकांनी लॉकडाऊनचा भंग करु नये, कारण आपल्या एका चुकीमुळे आपले कुटूंब आणि सहाजिकच देशाचे नागरिक या कोरोनाला बळी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही!


लोकनिर्माण,


संपादक - बाळकृष्ण कासार