पनवेल /लोकनिर्माण( सुनिल भुजबळ)
पनवेल प्रेस क्लब या संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड तर उपाध्यक्षपदी सागर पगारे यांची निवड करण्यात आली शनिवारी तारीख २६ एप्रिल रोजी नवीन पनवेल येथील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयात संस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष घरत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.![]() |
त्यानंतर संस्थेच्या पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नवीन कार्यकारणीची तसेच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सागर पगारे यांची निवड करण्यात आली संस्थेच्या सचिव पदी भागवत अहिरे तर सहसचिव पदी सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या खजिनदारपदी शैलेश चव्हाण तर सहखजिनदारपदी प्रसाद परब यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून संतोष घरत, विकास पाटील, राजेश कदम , सनिप कलोते , राजेंद्र सदावर्ते, सुनील भुजबळ , विजय कुमार जंगम , अनिल पाटील, चंद्रकांत मढवी , निवृत्ती पाटील, किरण बाथम, राहुल बोरडे , रोहित घाडगे, बल्लाळ पाटील, हेमंत लबाडे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी निवड झालेले देविदास गायकवाड हे गेल्या २५ वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करीत आहे त्यामुळे त्यांना पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची जाण आहे. प्रशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी रायगड पब्लिक स्कूल उभी करून शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव काम केले आहे. कर्मयोगी हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे तर गंध मातीचा हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे गायकवाड यांना दांडगा अनुभव असल्याने नवीन अध्यक्ष त्यांच्या पदाला योग्य न्याय देतील असा विश्वास संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांनी व्यक्त केला आहे.
सर्व पत्रकार सदस्यांना सोबत घेऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच राहील परंतु त्यासोबतच समाज आणि पत्रकार यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल पत्रकारांच्या कायद्याबाबत जनमानसात प्रबोधन केले जाईल. प्रिंट मीडिया , टीव्ही मीडिया तसेच सध्या डिजिटल मीडियात महत्व वाढत चाललंय त्यामुळे येणाऱ्या काळात या माध्यमांचा महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार आहे त्यामुळे पत्रकारांनी सर्व क्षमता आत्मसात करायला हव्यात असे गायकवाड यांनी बोलताना सांगितले.