संपादकीय - कोरोनाची शिकवण

 


कोरोनाच्या महामारीने संपुर्ण जगात हाहाकार माजलेला ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. कोरोनावर अद्याप कोणत्याही प्रकारचे औषध नसल्याने या महाभयंकर रोगापासून दूर राहण्यासाठी घराबाहेर न पडणे हाच एकमेव उपाय ठरलेला आहे. तो गर्दीचे ठिकाण हेरत असल्यामुळे आपण सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन केलेला आहे. कोरोना आज तिसर्‍या टप्प्यावर आहे. यासाठी २१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये अद्यवत सुसज्ज यंत्रणा शासनाने तयार केलेली आहे. यावर उपाययोजना होण्यासाठी जैविक शास्त्रज्ञही आपले काम करत आहेत. यावर उपाय योजना करण्यास जगात भारत अग्रेसर असेल. 
       आज अमेरीका, इटली, युरोप या देशात आपल्या अहंकाराने लाखो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. संसर्ग हा     जगामध्ये आला असल्याने भविष्यात या प्रगत देशात जैविक युद्ध  होऊन ते तिसर्‍या महायुध्दाकडे जाण्याचा कल दिसत आहे. अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र यांचे दिवस आता कमी झाले असून जैविक युध्दासाठी संपूर्ण जग संशोधन करण्यात व्यस्त आहे.  मात्र भारताने हे सर्व ओळखून लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाने तिसर्‍या टप्प्यात प्रवेश केला असला तरी इतर देशांच्या तुलनेत  कमी प्रमाणात असणार आहे. या  देशाची असलेली अर्थिक नाडी कमकुवत  होण्यास  सुरु झाली असून त्यावर उपाय योजना करणे महत्वाचे ठरणार आहे. यासाठी सध्या जिल्हा नाकाबंदी आहे. तरीही जनता रोज न घाबरता फिरत आहे. 
त्यांच्यावर कठोर कायद्याची  अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आज जरी देशात संचारबंदी असली तरी  जनता भाजी मार्केट मध्ये सोशल डिस्टंसींगचे पालन करताना दिसत नाहीत. यामध्ये एखादा रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्यास कोरोना घरोघरी पोहचविण्यात आपणच जबाबदार असणार आहोत.
       या काळात उद्योगधंदे बंद आहेत. तेथील कामागार सध्या चिंतेत आहेत.  हिच चिंता दूर करावयाची असेल तर या लोकांमध्ये घरीच किंवा आहे त्याच ठिकाणी राहणे फायदेशीर ठरणार आहे. सरकार प्रत्येक नागरिकाला अन्नधान्यापासून वंचित ठेवणार नाही इतकी साधन सामुग्री उपलब्ध आहे. त्यामुळे जगणार कसे हा विषय सध्या बाजूला ठेवावयास पाहिजे!
       कोरोनामुळे आज कुटूंब एकत्र आलेला आहे. दर तासातासाने हात पाय स्वच्छ धूणे, सांधिक उपासना, दुरदर्शनवर रामायण, महाभारत या मालिकेमधून वेळ जात आहे. तर अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडल्यानंतर माक्स बांधून जाणे, सोशल डिस्टेसिंग ठेवणे, स्वच्छता राखणे, या सर्वच गोष्टी आपण कोरोनाच्या भितीने शिकलो आहोत. भविष्यात भारतीय ही शिकवण कधीच विसणार नाहीत. आज शासन महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा  दक्षता घेत असून त्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणी प्रिंट माध्यमातील पत्रकारांकडून सर्व जगाला देण्यात येत आहे.  म्हणून जे अत्यावशक सेवेत काम करत आहेत त्यांना आपण घरीच राहून सहकार्य  केल्यास या देवदुतांना काम करण्यास उत्‍तेजन मिळेल. कारण ही माहामारी अनेक शहरे उध्द्वस्त करु शकेल इतकी ताकद या संसर्गात आहे.
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन ३ मे पर्यत वाढविले आहे. या १७ दिवसाच्या कालावधीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा संसर्ग ग्रीन झोनवर आणायचे  प्रयत्न केल्यास कदाचित त्या भागातील संचारबंदी शिथीलही होऊ शकते! जेणेकरुन  तेथील उद्योग धंदे सुरुवात होऊन सध्या असलेली अर्थिक टंचाई दूर होण्यास मदत होईल. आणि असे सर्व जिल्हे  ग्रिन झोनवर आणण्यासाठी आपण शासनाला  घरी राहूनच सहकार्य केल्यास येत्या काही दिवसात आपण कोरोनाला हद्दपार करु शकतो. नाहीतर पुन्हा लॉकडाऊन वाढवून आपली अर्थिक स्थिती खालावून नेण्यास आपणच जबाबदार ठरणार आहोत!


लोकनिर्माण,
संपादक - बाळकृष्ण कासार