प्‍लास्टिक पिशव्‍यांचा वापर करणा-या आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या व्‍यक्‍तींविरुध्‍द कडक कारवाई करण्‍यात येणार

कल्याण /लोकनिर्माण 
दिवसेंदिवस जटील होत जाणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने आता कडक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 25 मे पासून महापालिका क्षेत्रात ‘शून्य कचरा मोहीम’ राबविण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने नविन नियमावली लागू केली आहे. तसेच 25 मे नंतर कचरा वर्गीकरण करुन न देणा-या, प्‍लास्टिक पिशव्‍यांचा वापर करणा-या आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या व्‍यक्‍तींविरुध्‍द कडक कारवाई करण्‍यात येणार असून आवश्‍यकतेनुसार पोलीस ठाण्यात गुन्‍हेही दाखल करण्‍याचा इशारा महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.


महापालिका क्षेत्रातील विशेषतः कल्‍याण(प) येथील नागरिकांची आधारवाडी डंम्‍पींग ग्राऊंडमुळे होणा-या त्रासातून सुटका होण्‍याच्‍या दृष्‍टीने महापालिकेमार्फत शुन्‍य कचरा मोहिम २५ मे २०२० पासून संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविण्‍यात येणार आहे. त्यानूसार २५ मे पासून ओला आणि सुका एकत्र असलेला कचरा महापालिकेतर्फे उचलला जाणार नाही.


कचऱ्याबाबत अशी आहे ही नविन नियमावली…
१. घनकचरा व्‍यवस्‍थापन नियम २०१६ व मा.राष्‍ट्रीय हरित लवाद दावा क्रमांक १९९/२०१४ मधिल आदेशानुसार तसेच महाराष्‍ट्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचना व उपविधीनुसार ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा या प्रमुख प्रकारामध्‍ये कच-याचे वर्गीकरण करणे सर्वांना बंधनकारक आहे.


२. ओला कचरा या प्रकारात फळे, भाज्‍या यांचे टाकाऊ भाग, शिल्‍लक राहिलेले अन्‍न इत्‍यादींचा समावेश होतो. हा कचरा स्‍वतंत्र डस्‍टबीनमध्‍ये ठेवून तो देण्‍यात यावा अथवा सोसायटीमध्‍ये स्‍वतंत्र स्विकारण्‍याची व्‍यवस्‍था असलेल्‍या डस्‍टबिनमध्‍ये टाकावा. ओला कचरा कोणत्‍याही परिस्थितीत प्‍लॉस्टिक पिशव्‍यांमध्‍ये बांधला जाणार नाही अथवा त्‍यामध्‍ये प्‍लॉस्टिक, कागद व अन्‍य कच-याचे घटक राहणार नाही याची दक्षता घेण्‍यात यावी, ओला कचरा दररोज उचलण्‍यात येईल.


३. सुका कचरा या प्रकारात कागद , पुठ्ठा, प्‍लॅस्टिक, प्‍लॅस्टिक बाटली, प्‍लॅस्टिक डब्‍बे, कापड, चप्‍पलं, टायर, फर्निचर,  गाद्या,  केस, काच, रबर, धातू, ई-वेस्‍ट(इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तू, मोबाईल,  बॅटरीज, बल्‍ब, टयूब, कॉम्‍युटर, टी.व्‍ही.इत्‍यादीचे टाकाऊ भाग.) आणि थर्माकोल, सिरॅमिक, फोम इत्‍यादी प्रकारच्‍या कच-याचा समावेश होतो.
परंतू यामध्‍ये प्‍लास्टिक- कागद या प्रकाराव्‍यतिरिक्‍त इतर प्रकारचा कचरा तुरळक प्रमाणात उपलब्‍ध होतो.  त्‍यामुळे सुका कचरा घरामध्‍ये साठवून अथवा सोसायटीमध्‍ये वेगवेगळया गोणी अथवा डब्‍यामध्‍ये साठवून ठेऊन घंटागाडीमध्‍ये देण्‍याची व्‍यवस्‍था करावी, हा कचरा बुधवार आणि रविवार या दिवशीच स्विकारण्‍यात येईल.


४. सॅनिटरी नॅपकीन व डायपर एका कागदामध्‍ये गुंडाळून स्‍वतंत्रपणे घंटागाडीमध्‍ये दयावे, सोसायटीमध्‍ये स्‍वतंत्र डस्‍टबीन ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी.


५. नारळाचे शहाळे स्‍वतंत्रपणे घंटागाडीमध्‍ये देण्‍यात यावे.


६. घरगुती, घातक या प्रकारच्‍या कच-यामध्‍ये औषधाचे डब्‍बे,  औषधाच्‍या बाटल्‍या, ड्रेसिंग पट्टया व घातक घटक यांचा समावेश होतो. हा कचरा स्‍वतंत्रपणे घंटागाडीमध्‍ये देण्‍याची व्‍यवस्‍था करावी.


७. महापालिकेमार्फत ओला कचरा, सॅनेटरी नॅपकीन,  डायपर आणि नारळाचे शहाळे दररोज घंटागाडीमध्‍ये स्वतंत्ररित्या स्विकारण्‍यात येईल.


८. महापालिकेमार्फत ओल्‍या कच-यापासून खतनिर्मिती आणि बायोगॅसपासून विद्युत निर्मिती करण्‍यात येत आहे.


९. सुका कचरा पुनर्चक्रीकरण प्रक्रीयेसाठी पाठविण्‍यात येत आहे.


१०.घरगुती अपायकारक(सॅनेटरी नॅपकीन, डायपर व औषधांचे कंटेनर, इंजेक्‍शन्‍स्, ड्रेसिंग पट्टया इ.) कचरा महापालिकेच्‍या बायोमेडीकल वेस्‍ट ट्रीटमेंन्‍ट प्‍लॅन्‍टमध्‍ये पाठविण्‍यात येत आहे.


११.महापालिमार्फत आपल्‍या विभागात कचरा उचलण्‍यासाठी येणा-या घंटागाडयांची वेळ निश्चित करण्‍यात आलेली असून त्‍यानुसार आपल्‍या विभागामध्‍ये घंटागाडीचा क्रमांक वाहन चालक, मुकादम, सॅनिटरी इन्‍सपेक्‍टर यांचे मोबाईल क्रमांकाचे फलक दर्शनी भागामध्‍ये लावण्‍यात येणार आहेत.  कच-यासंदर्भातील अडचणीसाठी नागरीक त्‍यांच्‍याशी संपर्क साधु शकतात.


तसेच २५ मे २०२० पूर्वी सर्व प्रभागातील कचरा संकलनाबाबत घंटागाडयांचे नियोजन करण्‍यात येऊन संबंधित कर्मचा-यांना याबाबत प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. नागर…