*- सं - पा - द - की - य -*  --  *कोरोनानंतरचे जीवन* 

   कोरोनाच्या वाढत्या  संसर्गाने भयानक स्थिती संपूर्ण जगावर ओढवलेली आहे १९०८ झाली त्या वेळी अशाच प्रकारची महामारी आली होती आणि त्या महामारीत करोडो लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळच्या साधनसामग्रीत आणि आताच्या आधुनिक युगाच्या काळातील साधनसामग्रीत फरक पडला असला तरीही लोकसंख्येच्या प्रमाणात हा संसर्ग कमी प्रमाणात आहे  कारण त्यावर वैज्ञानिकांनी आणि राजकीय सत्तेने केलेली मातच म्हणावी लागेल! आज कोरानाच्या लाॅकडूनला तीन महिने होत आहेत. या तीन महिन्यांच्या काळात उद्योगधंदे बंद झाल्यामुळे संपूर्ण  आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. बेकारांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवण्याची शक्यता आहे. लाॅकडाऊन  कधी ना कधी उठणार आहे, परंतु त्याआधी अनेक जिल्ह्यातून मुंबई - पुणे आणि इतर जिल्ह्याच्या  ठिकाणी अडकलेले चाकरमानी यांची मुक्तता करावी लागणार आहे. कारण लाॅकडाऊन नंतर उद्योग-व्यवसाय  बंद असल्यामुळे रोजगार लवकर मिळणार नाही. त्यासाठी त्यांना आपाआपल्या गावी जाण्यासाठी सरकारलाच व्यवस्था  करावी लागणार आहे. कारण या संसर्गाने  पूर्वी जो बहिस्क्रुत वर्ग होता तशाप्रकारे या संसर्गाची गणना केलेली आहे. (बहिस्क्रुत म्हणजे वर्णव्यवस्था)  आणि हा संसर्गजन्य रोग आहे इतकाच यामधील फरक आहे.  जिल्ह्याबाहेरील असणा-या आपल्या बांधवाना लवकरात लवकर कसे आणता येईल याचा त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने येणाऱ्या लोकांची  तपासणी करून नंतर त्यांना आपापल्या तालुका, जिल्ह्यात आणून क्वारंटाईन करावे लागेल. त्यासाठी शासकीय अधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांच्या समन्वयाने करणे गरजेचे ठरणार आहे. त्यांच्या क्वारंटाईनची मुदत संपल्यानंतरच आपल्या घरी सोडण्यात  यावेत. म्हणजे त्या गावातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी  कोणतीही शंका येणार नाही.    



       *आलेल्या लोकांचे पुढे काय होणार?*



   आलेले लोक आपापल्या गावात येतील त्या वेळी कमीत कमी तीन महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू  शासनाकडून पुरविण्यात याव्यात.  त्यानंतर पावसाला सुरुवात होणार आहे. उद्योगधंद्याला जरी परवानगी मिळाली तरी दोन महिने उद्योग बंद असल्यामुळे ते धिम्या गतीने चालतील. त्यामुळे सुरुवातीला कामगार कमी लागतील. कारण यापूर्वीचा मागणी असलेला माल पडून आहे. तो जरी बाहेर काढायचा म्हटल्यास  त्यांच्या ग्राहकांवरही कोरोनाचे सावट असल्यामुळे मालाला उठाव होणार नाही. मनुष्यबळ हा सर्व जग कोरोनामुक्त झाल्यानंतरच हळूहळू त्यांना काम देण्यात येईल.  तोपर्यंत हे कामगार काय  करणार?
        यासाठी शासनाने ऋषी विभागाला प्रधान्य दिले असल्यामुळे सध्या गावोगावी ब-याच जमिनी शेतीविना पडिक राहिल्या आहेत. त्यांना योग्य अर्थ सहाय्य केल्यास  शेतीचे उत्पन्न वाढू शकते. परंतु काही शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जमिनी कमी असल्यामुळे मेहनत करूनही उत्पन्न मिळणार नाही. यासाठी त्यांना सामुदायिक आणि सहकार तत्वाकडे वळवावे लागेल. जेणेकरून  शेतीबरोबर पशुधन वाढविता  येईल. म्हणजेच उत्पन्नाचे साधन तयार करता येईल. 
      आपण आज जरी मोठ्या लठ्ठ पगारावर काम करत असलो, तरी यापुढे आपणास तितकाच पगार मिळेल याची शक्यता कमी आहे. अनेक कामगारांनी कर्ज काढून घरे घेतलेली आहेत त्यांचे हप्तेही वेळेत जाणार नाहीत. पुन्हा मानसिकतेत वाढ होऊन कुटुंबाची हेळसांडणी होईल.  त्याकरिता मिळेल त्या ठिकाणी काम करण्याची वृत्ती ठेवून निदान भविष्याची तरी चिंता मिटविता येईल!
     आज कोणताही देश शेतीविना अपुर्ण आहे.   त्यासाठी आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाचा वापर केल्यास आपल्या जिल्ह्याची उन्नती होऊ शकते. भविष्यात हे उद्योग चालणारे  आहेत. त्यासाठी त्यांना  मनुष्यबलाची आवश्यकता असणार  आहे. परंतु आजचा दिवस आणि उद्याची असणारी चिंता ही आपल्याच हाती असणार आहे!


लोकनिर्माण,


संपादक - बाळकृष्ण कासार 


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image