पानगळ  - प्रदीप पाटील

  


 


गळ होते पानांची 


वस्र फेकली अंगावरची 


चक्र सारी पृथ्वीवरची 


ऋतु येती नित्याची.... 


 


किमया भारी वृक्षांची 


कमतरता होते पाण्याची 


संकटात झेप वाढण्याची 


गरज भागवता मानवांची.... 


 


उन्हात छत्री पानांची


निर्मिती करता ऑक्सिजनची 


खत निर्मिती पालापाचोळ्याची 


पोत सुधारते शेताची.... 


 


पानगळ पण उपयोगाची 


वेळ खंभीर होण्याची 


बोध घेत वृक्षांची 


रीत अशींच जगण्याची..... 


 


प्रदीप मनोहर पाटील 


मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा 


जिल्हा. जळगाव 


मो. 9922239055©®