मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न


 अनुभव संकीर्तन आणि सत्संग सोहळा (रत्नागिरी)

नुकताच रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरीत आठवडा बाजार नजिकच्या प्रमोद महाजन स्टेडियमवर मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या  अनुभवसंकिर्तन सह भक्तीरसनाचा भक्तीमय सत्संग सोहळा  उत्साहात संपन्न झाला.‌ या सत्संग सोहळ्या करिता महाराष्ट्रातील अनिरुद्ध उपासना केंद्रामधून असंख्य बापू भक्त गण आपल्या सद्गुरूंच्या प्रेमाच्या कृपा आशिर्वादासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी चार वाजता असल्याने बापुभक्तांकडे पास जरी प्रत्येकाकडे असले तरी आपल्या सद्गुरूंना जवळून पाहता यावे म्हणून भर उन्हात उत्सुकतेने जागेवर बसले होते.‌ या दिवशी सुट्टी असल्याने रहदारी जाम असते. परंतु जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार रहदारी जाम होऊ नये म्हणून सत्संग कार्यक्रमाकरिता संपूर्ण जिल्हाभरातून अंदाजे १० ते १२ हजार भक्तगणांचा जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता आहे. सत्संग कार्यक्रमादरम्यान भक्तगणांची व त्यांच्या वाहनांची परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होवू शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  आठवडा बाजार नाका ते काँग्रेस भुवन दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा आणि वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे, असे आदेश  जारी केले होते. प्रशासन यंत्रणेवर ताण येऊ नये म्हणून असंख्य आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले बापू सेवक यांनी उत्तम साथ दिली.        नियोजित वेळेतच अनिरुद्ध बापूंवरील भक्तीरसाच्या  कार्यक्रमाला अत्यंत सुरेल संगीताने भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. हा कार्यक्रम 'न भूतो न भविष्यती'  इतका यशस्वी झाला की,  पत्रकार असूनही देहभान विसरून अनेक वर्षे मी पाहिलेल्या बापूंच्या उपासनेत आणि  गुरुवारी  न्यु. इंग्लिश स्कूल बांद्रा येथील हरिगुरुग्राम मध्ये बापुंचे प्रवचन आणि इतर भक्तीमय सोहळ्यात नुसता ठोंब्यासारखा हालचाल न करता स्तब्ध राहणारा आज प्रत्येक गायकांनी गायलेल्या अभंगावर देहभान विसरून नाचू लागलो. फक्त लेखनी हाती धरणारा अन् कधीही न नाचणारा, आज मला खरोखरच बापूंनीच नाचायला लावले यात शंका नाही. फक्त एकच खंत होती की, या सोहळ्याला बापू, नंदाई, दादा यांचे दर्शन होईल या हेतूने ही बरेच भक्त गण आले होते. शेजारी बसलेल्या एका विराने विचारले की, आमचे कुटुंब आज बापूंना पाहण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारले की आपण उपासना केंद्रात किती वर्ष येता. जवळपास पाच वर्षे! मग बापू जळी, पाषाणी, आणि आपल्या हृदयात असल्याने आपण हा सोहळा किती मनापासून आणि उत्सुकतेने पाहात आहोत हे बापू प्रत्यक्ष पाहात आहेत. कारण आद्य पिपाने रचलेले अभंग आणि  केलेल्या संकीर्तनला हा विठ्ठल रुपी बापू प्रत्यक्षात आपल्या सोबत असतोच असतो.

     अनुभव संकीर्तनाने तर नवीन आलेल्या भक्तगणाला बापूंची ओढ नक्कीच लागलेली असणार! एकंदरीत ही भक्ती, सेवेची पाठशाळा असल्याने या पाठशाळेत येणाऱ्या सर्व शिक्षीत वर्गाला आणि जे भक्त काही कारणाने उपस्थित राहीले नाहीत त्यांनाही आपल्या सद्गुरूंचा आशिर्वाद मिळू शकतो. याचे उत्तर आपण केलेल्या प्रेममय भक्तीतूनच मिळेल! त्याचे उत्तरही कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या चित्रफीती मधून जमलेल्या असंख्य बापू भक्तांना दर्शन रुपाने  दिले.       या सोहळ्याला संपुर्ण बापूंचे समीरदादांसह सहकुटुंब, सीईओ सुनील सिंह मंत्री, संगीतकारसह गायिका फाल्गुनी पाठक, त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी -  रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत, बाप्पा सामंत, डॉ.  आमदार राजन साळवी यांनीही उपस्थिती दर्शविली. 


अंबज्ञ, नाथसंविध्


लोकनिर्माण,

संपादक - बाळकृष्ण कासार