संस्कार आणि संस्कृती -- कवी - प्रदीप मनोहर पाटील

 


 


वय असतं लहान 


शिकवण मिळते छान 


आई वडील बाबा 


शिकवतात लहानथोरांचा सन्मान... 


 


कुटुंब शाळा परिसर 


गाव पुस्तकं गाथा 


यातुन मिळते ज्ञान 


टेकवत वडीलधाऱ्यांना माथा... 


 


जगायचं वागायचं कसं 


यालाच म्हणतात संस्कार 


सत्यवादी आधित्मिक वागणुक  


 पाहुंन मन गार... 


 


रूढी परम्परा पद्धती 


आचार विचार जीवनचाली 


जगण्याची कृती संस्कृती


त्यात संस्कार दिसली... 


 


 उत्तम करा कृती 


जोडा त्यातुन नाती 


अंगीकारु त्यात नीती 


 छान येईल प्रचिती ... 


 


प्रदीप मनोहर पाटील 


मु. गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव 


मो. 9922239055©®