"दलितांनो ,तुमचे कैवारी तुम्हीच व्हा " - यशवंत ब. नारायणकर


    अनादिकालापासून दलितांवर अत्याचार होतच आहेत. कारण सुरुवातीला राजा महाराजांची गुलामगिरी सहन केली. नंतर इंग्रजांनंची आणि मग आता नेते मंडळांची.
        पण न्याय कोणीच पूर्ण दिला नाही. सर्वांनी मात्र आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करून घेतला. घराण्याच्या परंपरेनुसार देवी-देवतांच्या रिती रिवाजी मध्ये स्वतःला बांधून घेऊन हा समाज दलित राहिला आहे.सुरुवाती पासून शिक्षणासाठी वंचित राहिल्यामुळे मोल मजुरी हमाली करून आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यातच, आयुष्याला मृत्यूच्या शय्यावरच विश्रांती मिळत असावी. 
        उच्चवर्णीय लोकांच्या वासनेचा बळीचा बकरा झालेला समाज म्हणजे हरिजन दलित वगैरे वगैरे होय.
          या समाजाला कोणीही न्याय देऊन स्वतःच्या पायावर कुर्‍हाडी मारून घेणार नाही. याचे कारण त्यांचे बळ, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची एकाग्रता आणि निष्ठा होय.लोखंडा सारख्या धातूला त्याचे पाणी करून त्याला आकार देण्याची जी  विलक्षणच ताकद आहे ती या समाजात आहे. हे सर्व उच्चवर्णीयांच्या पुरेपुर लक्षात आले आहे. म्हणून ते संघटित होऊन देत नाहीत.
            महत्त्वाचा मुद्दा खरा सांगायचा झालाच तर सर्व दलितांनी एकत्र येणे आजच्या काळाची गरज आहे. बौद्ध धर्म समाजाने हिंदू धर्मातल्या दलितांना सुद्धा एकत्र घेऊन एक व्यासपीठ तयार करण्याचे धोरण आखले पाहिजेत. त्यातून निवडणुका सुद्धा लढवल्या पाहिजेत पण बौद्ध धर्म हा दलित धर्माचा उच्चवर्णीय धर्म मानून हिंदू धर्मीय दलिताची नेहमीच अवहेलना करण्याचे प्रकार करताना दिसत आहेत. अशामुळे आपलेच हात आपण तोकडे करत आहोत याची जाणीव का होत नाही.
            सवलती सर्वांनाच समप्रमाणात मिळतात पण आम्ही एक छत्र येऊ शकत नाही याचे कारण आमच्यात असलेली आमचीच विकृती आहे. भारतातील सर्व दलितांनी एकत्र येऊन आपले राज्य अस्तित्वात आणणे गरजेचे आहे.
         कारण बाबासाहेबांनी संघटीत व्हा हा संदेश सर्व दलित बांधवांना दिलेला आहे. हा मुद्दाच काही लोकांना कळलेला दिसत नाही. फक्त बौद्ध धर्मांनी दलितांचा पाडा नाचवत राहु नये. इतरही समाजाला एकत्र घेऊन चालण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. चर्मकार समाज हा मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आहे. इतरही समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांचा अभ्यास परिपूर्ण आहे. एकसंघ होऊन जोपर्यंत आमचे विचार समाजाच्या हितासाठी, स्वतःच्या देशासाठी लढत नाही. तोपर्यंत आम्ही दलितांच्या संरक्षणासाठी एकत्र येऊ शकत नाही. जोवर न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. कारण सर्व उच्चवर्णीयाच्या आशीर्वादानेच आज महाराष्ट्रापासून ते भारतात सर्वीकडे दलितांवर खुल्या आम अत्याचार दहशतवाद केला जातो. त्यांना कायद्याची भीती सुद्धा वाटत नाही. कायदे बनवणारे तेच. न्याय देणारे तेच. मंत्री तेच.आणि जनता जनार्दन तेच. आपल्यावर वर्षेनवर्षे अत्याच्यार करत आहेत. आणि हे अनंत काळ चालूच राहणार आहे. तुम्ही फक्त मोर्चे काढा. निषेध नोंदवावा. ते तुमचे डोळे पुसतील आणि अत्याचार करत राहतील.
               जोपर्यंत आपण सर्व मिळून सत्ता ताब्यात घेत नाही, कायद्याची खरी अंमलबजावणी आपण करत नाही तोपर्यंत न्याय मिळणे शक्य नाही. सर्व दलित मित्रांनी आपले देव देव्हारे बाजूला ठेवून फक्त दलित शक्ती च्या नावावर एकत्र येऊन आपण प्रशासन ताब्यात घेतले पाहिजे. गाय काय खाते हे महत्त्वाचे नसून ती काय देते हे महत्त्वाचे आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे.
          काही दिवसातच आपले सर्व सवलती आपोआप कमी होत जाणार आहेत. कारण शासन दरबारी शिक्षण प्रशिक्षण सर्व काही महाग करून ठेवले आहेत. फक्त उच्चवर्णीय लोकांसाठीच ते खुले राहणार आहेत. डॉक्टर होण्यासाठी पन्नास लाख रुपये चे डोनेशन दलित बांधव कधी जमा करणार आणि आपल्या मुलांना कधी डॉक्टर करणार इतक्या सर्वसाधारण गोष्टी या लोकांनी महाग करून ठेवले आहेत. हे आपल्यावर सरळ-सरळ दरोडा घालत आहे. आपलं अस्तित्व नष्ट करण्याचे त्यांचे धोरण चालले आहे. सरकारी दवाखाने गाई-म्हशींच्या गोठ्या याप्रमाणे ठेवले आहेत. सरकारी शाळा महाविद्यालय भिकाऱ्यासारखे ठेवले आहेत. या सर्व गोष्टी उघड्या डोळ्यांनी खुल्या मनाने विचार केला तर आपली लायकी काय आहे ते त्यांनी दाखवले आहे. यावर आपण आपल्याच लोकांची उणीदुणी काढत बसू तर ते त्यांच्या कामात पूर्ण करण्यास यशस्वी होणार आहेत.आपण फक्त त्यांची गटारी साफ करण्याचे काम आमच्या नशिबी ते देणार आहेत. 
        जर आज या भविष्याचा विचार आपण सर्व दलितांनी केला नाही तर उद्या आपली गत कुत्र्याप्रमाणे होणार आहे. यात तिळमात्र शंका नाही.आमचे नेतेमंडळी दलितांचे कैवारी म्हणून मंत्रिमंडळात वावरत आहेत. ते मुळातच आपले नाहीत. ते फक्त बुजगावणे आणि ठकेबाज आहेत. त्यांना दलितांच्या सुखदुःखाची काही घेणे देणे नाही. कुठल्या हक्कासाठी एखाद्या दलित मंत्रिमहोदयांनी उपोषण केले आहे, ते दाखवून द्या. कारण त्याच्या सत्तेची त्यांना भीती वाटत आहे. वाघाच्या कळपात एखादे मांजर असावे अशा पद्धतीने त्याची अवस्था झालेली आहे. तो तुमच्या साठी काय तर स्वतः साठी सुद्धा बोलू शकत नाही. अशी परिस्थिती त्यांच्या स्वतःची झाली आहे. आणि तुम्ही त्यांच्या विश्वासावर बसून भविष्याच्या वाटचालीचे सूत्र संचालन त्यांच्याकडून करणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे.
               सर्व दलितांनी आपापले दैवत बाजूला घरात देव्हाऱ्यावर देवळात ठेवा आणि एका व्यासपीठावर एकत्र या त्याशिवाय तुम्हाला कोणीही न्याय देणार नाही. तुमची ताकद बघून तुम्हाला सलाम केले जाणार आहे. जोपर्यंत तुमची ताकद तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला गुलामच ठेवले जाणार आहे.


 यशवंत ब. नारायणकर.
९८६९६४४६८९.