हेल्पलाइन !!

 


                                १० जून २०२०


           आजकाल घर बसल्या बसल्या मोबाईल फोन करून, हवं ते "ऑनलाइन बुकिंग" करून वस्तू मागवू शकतो.


           तसं "लाॅकडाऊनच्या" काळात, आजारी झाल्यावर मोबाईल फोन करून "हेल्पलाइन क्रमांक" वर मदत मागितली तर.....?


         मी 'हेल्पलाइन' क्रमांक वर फोन लावला आहे.


*हेल्पलाइन:-* आपले "कोविड- १९ आरोग्य सेवा हेल्पलाइन" मध्ये सहर्ष स्वागत आहे !


आपल्याला काय मदत हवी आहे ?


चौकशी साठी १ नंबर दाबा,


तक्रार साठी २ नंबर दाबा,


आणि हाॅस्पिटल बेड साठी ३ नंबर दाबा.


*मी :-* १ नंबर दाबले


*हेल्पलाइन:-* आपले वय वर्षे १५ च्या आत असल्यास १ नंबर दाबा,


आपले वय वर्षे २५ च्या पुढे असल्यास २ नंबर दाबा,


आणि आपले वय वर्षे ६० च्या पुढे असल्यास ३ नंबर दाबा.


*मी :-* २ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपणांस डायबिटीस असेल तर १ नंबर दाबा,


आपणांस हृदयविकार असेल तर २ नंबर दाबा,


आणि आपणांस टी. बी. असेल तर ३ नंबर दाबा.


*मी :-* ० नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपणांस ओला खोकला असेल तर १ नंबर दाबा,


आपणांस सुका खोकला असेल तर २ नंबर दाबा, 


आणि आपणांस जास्तच खोकला असेल तर ३ नंबर दाबा.


*मी:-* २ नंबर दाबले


*हेल्पलाइन:-* आपल्या छातीच्या एक्सरे साठी १ दाबा, 


आपल्या मेंदूच्या एम. आर. आय. साठी २ दाबा, 


आणि आपल्या पोटाच्या सोनोग्राफी साठी ३ दाबा.


*मी:-* ० नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपल्याला थंड पाणी पिण्यासाठी १ नंबर दाबा,


आपल्याला कोमट पाणी पिण्यासाठी २ नंबर दाबा,


आणि आपल्याला दूधात हळद मिसळून पिण्यासाठी ३ नंबर दाबा.


*मी:-* ३ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपणांस साधा तापासाठी १ नंबर दाबा,


आपणांस चढ उतार तापासाठी २ नंबर दाबा, 


आणि आपणांस न्युमोनिया तापासाठी ३ नंबर दाबा.


*मी:-* १ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपल्याला तापाच्या गोळी साठी १ नंबर दाबा,


आपणांस डॉ साहेबांच्या सल्ला साठी २ नंबर दाबा,


आणि आपल्याला एॅडमिट होण्यासाठी ३ नंबर दाबा.


*मी:-* ३ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* सरकारी दवाखान्या साठी १ नंबर दाबा,


खाजगी आयसोलेशन साठी २ नंबर दाबा,


आणि होम क्वारंटाईन साठी ३ नंबर दाबा.


*मी:-* ३ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपल्या बुद्धीच्या इम्युनिटी साठी १ नंबर दाबा, 


आपल्या हृदयाच्या इम्युनिटी साठी २ नंबर दाबा, 


आणि आपल्या शरीराच्या इम्युनिटी साठी ३ नंबर दाबा.


*मी:-* ३ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपल्या बुद्धीच्या इम्युनिटी साठी पुस्तके वाचण्यासाठी १ नंबर दाबा,


आपल्या हृदयाच्या इम्युनिटी साठी योगा माहिती साठी २ नंबर दाबा,


आणि आपल्या शरीराच्या इम्युनिटी साठी लिंबू- आवळा- संत्र्याच्या व्हिटॅमिन सी साठी ३ नंबर दाबा.


*मी:-* ३ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपल्याला सकस आहारासाठी १ नंबर दाबा, 


आपल्याला मांसाहारी साठी २ नंबर दाबा, 


आणि आपल्याला मद्यपान साठी ३ नंबर दाबा.


*मी:-* १ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* चांगल्या माॅल साठी १ नंबर दाबा, 


स्वस्त बाजारासाठी २ नंबर दाबा,


आणि आपले पाय मोकळे करण्यासाठी ३ नंबर दाबा.


*मी:-* २ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपण रेड झोनमध्ये असाल तर १ नंबर दाबा, 


आपण ऑरेंज झोनमध्ये असाल तर २ नंबर दाबा,


आणि आपण ग्रीन झोनमध्ये असाल तर ३ नंबर दाबा.


*मी:-* ३ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* आपले ग्रीन झोनमध्ये अर्थात परिवार झोनमध्ये आपले स्वागत आहे.


आपल्या घरात मदत करण्यासाठी १ नंबर दाबा, 


आपले छंद- पुस्तके- मालिका- चित्रपट साठी २ नंबर दाबा, 


आणि आपले वेळेवर जेवण- झोपण्यासाठी ३ नंबर दाबा.


*मी:-* ३ नंबर दाबले.


*हेल्पलाइन:-* (आनंदात) आपण घरात बसून कोरोना व्हायरस महामारी विषाणू विरोधात यशस्वी लढा देत, आपणांस "कोरोना योद्धा" म्हणून, सन्मानित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 


आपण "कोविड- १९ आरोग्य सेवा हेल्पलाइन" क्रमांक वर चौकशी करून 'सहकार्य' केल्याबद्दल आपले "धन्यवाद" व्यक्त करत आहे.


आणि आपण योग्य ती काळजी घेऊन, "आत्मनिर्भर" झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !!


घरात रहा-सुरक्षित रहा- स्वास्थ रहा !


आपला आजचा दिवस घरात आनंदात जावो !!


                  *समाप्त*


                                  लेखक


                             विहल देवळेकर


                                  मुंबईकर