चक्रीवादळ. -- माधवी प्रदीप वॆद्य

 


वादळाने उध्वस्त परिसर केविलवाणा भासत होता  
शून्य नजरेने ओशाळल्यागत सागराला पहात होता
त्याला वाटे आपल्याला या लाटांनी सामावून घ्यावे 
सारे गमावलेल्या या मानवांना तुझ्या उदरात लोटावे...१


आपल्या मस्तीत बेभान वारा सुटलाय सुसाट्यात 
खवळलेल्या सागराचा किनारा बदले उंच लाटात
बुडालेय सारे काय झाकु,काय जपु,झाला जे प्रहार
डोळे भरून बघे सर्व,आपले विस्कटले सारे घरदार...२


ठाम उभ्या वादळाची संकटापूर्वी जीवघेणी शांतता
घट्ट नीट उभे रहा,सांगणे साऱ्या गाव सोडून जाता
पिसाळलेल्या प्राण्यासारखे सुटलेय  वादळ  बेफाट
थोड्यासाठी घरादारास मातीत मिळवेल त्याची लाट...३


बायकापोरांशिवाय काहीही नेता तुज जे येणार नाही
चिंता नसे उभा आहे मी,परिसरातील झाडाची ग्वाही
परिचयाचा वारा वादळ होत विक्षिप्त होई काही क्षण
जणू स्वतःवरचे स्वतःच सोडले,त्यांनी त्याचे नियंत्रण...४


निर्मनुष्य गावात जे बेभान होऊन असे घातले थैमान
नाही दिसे मंदिर,झाड, घर,कशाचे नसे जे त्यास भान
काही ना उरले चहूकडे आकांत,असे शांत मनी दुःख 
मुले व अस्ताव्यस्त प्रपंच,मनी जिवंत असल्याचे सुख...५


उध्वस्त गाव, गावकरी वादळात,नेटाने उभे असताना
भिंत पडली,कौले उडाली,जिद्द हाती काही नसताना 
संसार बेचिराख जो,खुप वर्षाची वृक्ष संपदा झोपवली 
वादळाचे रौद्ररूप शांत कराया मानवी जिद्द झेपावली...६
 
 माधवी प्रदीप वैद्य (डोंबिवली)
मोबाईल - 9930511937