इतिहासाची पुनरावृत्ती अशक्य नाही - रामकृष्ण अभ्यंकर (लेखक)

 


      सुमारे १००० वर्षांपूर्वीचा भारताचा नकाशा हल्लीच्या पेक्षा खूप वेगळा नक्कीच होता. काबुल, कंदहार, अफगाणिस्तान, बलुचीस्तान पासून श्रीलंका आणि पूर्वेकडे अगदी इंडोनेशिया, कंबोडिया, म्यानमार आदि सारा प्रदेश अखंड भारतात समाविष्ट होता. आजही त्याच्या  स्मृति / अवशेष / निशाणी त्याची साक्ष देतात. परंतु मध्यंतरीची कठोर धर्मांधता / सत्ता पिपासू वृत्ती व क्रूरता  इत्यादीच्या अति हव्यासापोटी ह्या अखंड हिंदुस्तानची अनेक शकले झाली हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
    धर्म / पंथ इ. बाबी हल्ली प्रकर्षाने जाणवत असल्या तरी सारी पौर्वात्य संस्कृती एक असून पाश्चिमात्य संस्कुतीपासून ती बरीच वेगळी आहे. तो सामाईक धागा पकडून पुन्हा सारे एकदिलाने एकत्र येऊ शकतात. इतिहासाची पुनरावृत्ती होऊन अखंड हिंदुस्तान बनू शकतो, अर्थात त्यासाठी विचारांची व योग्य कृतीची पावले पडायला हवीत. अथक परिश्रम, सातत्य, विचारांची देवाण घेवाण सतत आपापसात व्हायला हवी. हे एका रात्रीत अखंड भारताचे दिवास्वप्न प्रत्यक्षात होणारे नसले तरी कालांतराने का होईना अशक्य  देखील नाही असा विश्वास वाटतो. 
 - रामकृष्ण अभ्यंकरध्वनीचित्रफित - पराग कुलकर्णी
https://www.instagram.com/tv/CD4QKqkngUG/?igshid=17no9f6cyf118