पाटणच्या मुलींची क्रिकेट डिफेन्स (आर्मी) अकादमीसाठी निवड

 

पाटण लोकनिर्माण/ श्रीगणेश गायकवाड 

 येथील निकम स्पोर्ट्स क्लबच्या मुली शांभवी शिरीष देशमुख व अवंतिका विद्याधर भागवत यांनी उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केल्याने त्यांची पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत झालेल्या क्रिकेट डिफेन्स (आर्मी) अकादमीच्या अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. 


१५ वर्षांखालील गटात या दोन मुलींची निवड झाली आहे. त्यांना निकम स्पोर्ट्स क्लबचे संजय निकम, शिक्षक धर्मेंद्र पवार तसेच शिरीष देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे क्लबचे संस्थापक अध्यक्ष बकाजीराव निकम, चंद्रगुप्त निकम, मंगेश पाटणकर, वैभव पाटणकर, शंकर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निंगराज चौखंडे, सागर पाटोळे, विलास मोरे, दत्तात्रय जगताप यांनी अभिनंदन केले.