- सं - पा - द - की - य -* गणेश चतर्थी निमित्त विशेष संपादकीय -- कोरोनाच्या सावटातील गणेश ऊत्सव

                
              दिनांक २२/८/२०२०


कोरोनाच्या सावटातील गणेश ऊत्सव


                  
       कोरोनाच्या भितीने पोटाची खळगी भरण्यासाठी तो इतरत्र रोजगार शोधत आहे. त्यातच एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यास सरकारी रुग्णालयामध्ये जागा नाही अशा सबबीवर खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागते. आणि भरमसाठ भितीने कोरोना निगेटीव्ह असतानाही बिलाचे लाखांचे आकडे पाहिल्यानंतर ह्दय विकाराच्या झटक्याने बरेच रुग्ण दगावले आहेत. आज अनेकांची स्थिती खालावली आहे. सरकारने ही जनता देशाची संपत्‍ती आहे असे समजून त्यांच्यावर विना मोबदला ऒषधोपचार आणि अर्थ सहाय्य करणे गरजेचे आहे. उद्या कोरोना जाईलही आणि दुसरा करोना येईलही, परंतु अशा मध्यवर्गीयांना जर सहाय्य मिळाले नाही तर भारतात  येण्या-या अनेक कंपन्यांमध्ये कामगार कोठून मिळतील याचाही विचार क्रमप्राप्त आहे. 
          मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने लॉकडाऊन केले आहे. करणेही तितकेच गरजेचे आहे. दरवर्षी येणारे सण उत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे त्यावर  विरजन पडले आहे. सण उत्सवामुळे बाजारपेठ खुलवली जाते. परंतू बाजारपेठ जरी उघडली असली तरी आज लोकांकडे खरेदी करण्यासाठी पैसा नाही, आज गणेशोत्सवासाठी  शहरातून अनेक गणेशभक्‍त आपल्या  बाप्पाला आणण्यासाठी गावी जात असतात. परंतु कोरोनाचे बाप्पवरही सावट असल्यामुळे भक्‍तही आपल्या जीवाला घाबरत आहेत. आपल्या गावी जाण्याकरीता सरकारने सरतेशेवटी एसटी चालू केलेली आहे. दिलासा देणारी बाब असली, तरी दहा दिवासांच्या काॅरांटाईनमुळे भक्‍तगणाला आता बाप्पाला आपल्या घरुनच नमस्कार करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यासाठी गणेशभक्‍तांनी आपली प्रार्थना आपल्या घरातच राहून करावी  लागणार आहे. भावनेच्या जोरावर आर्तताई पणा न करता सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
        कोकणात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे दरवर्षी दहा लाख गणेश भक्‍त जात असतात. तेच या कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी फक्‍त दोन लाख गणेश भक्‍त कोकणात पोहचले आहेत. कारण हे दहा दिवसापूर्वी जाणारे गणेशभक्‍त रोजगार  नसल्यामुळे पोहचले आहेत.  तर नोकरी करणार्‍या गणेश भक्‍तांना ही अट पेलवणारी नाही. यामुळे जे नोकरदार गणेशभक्‍त आहेत त्यांनी  यावेळी बचत होणार्‍या खर्चाचा सामजिक भान ठेवून गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा केल्यास नक्‍कीच गणराया आपल्यावर संतुष्ट होईल. पूर्वी सर्वच चाकरमानी बाप्पाला आणण्यासाठी आपापल्या गावी जात होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे आता जे  बेरोजगार झाले असले तरी त्यांनी आपला धीर न सोडता गणरायाला साकडे घाला की, पूढील वर्षी आज जे चाकरमनी आलेले नाहीत त्यांना पूढच्या वर्षी तुझ्या सेवेला घेवून ये!
     कोरोनाच्या सावटाने गणराय जरी अस्वस्थ असले, तरी तो जगाचा पालनहार आहे. यापूर्वीही अनेक संकटे आलेली आहेत. त्यातून ते निभावूनही गेले.  त्यावेळी तेथे कोणतेही संसाधने उपलब्ध नव्हती. मात्र मानवाचा हव्यास आणि अनमिज्ञतेमुळे आजही निसर्गाची लयलुट करुन अनेक संकटांना आमंत्रण देणारे आपणच आहोत! त्याच निम्मीताने पुढील पिढीला वाचविण्यासाठी हा कोरोना राक्षस आपल्या समोर आवासून उभा आहे. त्याला विरोध न करता, समोर न जाता एकाच जागी बसून गणरायाला साकडे घालने हा एकमेव उपाय केला, तर हा कोरोनारुपी राक्षस हतबल होऊन श्री गणेश आपल्या जवळ बसलेल्या भक्‍तांना नक्‍कीच वाचवू शकेल!
लोकनिर्माण,
संपादक - बाळकृष्ण कासार