*- सं - पा - द - की - य -* सात बारा सोपा पण, कर्ज घेताना घेऊ नका धोका!

 


     भारताच्या स्वातंत्र्यानंतरही महसूल विभाग (तहसिल) शेतकर्‍यांनाआपल्या जमीनीची नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालावर अवलंबून होती. पाच सहा गावांमधून एका तलाठ्यााची नेमणूक केली असल्यामुळे प्रत्येक अशा गावातील शेतकर्‍यांना तलाठ्याचे कार्यालयात जाण्यासाठी पाच सहा किलोमिटर पायी प्रवास करावे लागत होते.  त्यातच तलाठी यांना महसूल खात्याने निमंत्रण पाठवले तर त्यांला आपल्या चावडीचा रस्ता गाठावा लागत असे. त्यामुळे इतक्या लांबून पायी प्रवास करणार्‍या शेतकर्‍यांच्या चपला झिजून झिजून आतील तळपायाचीही झीज झाली. तलाठी एकदा भेटले की लगेच काम होईल याची शाश्‍वती नाही, त्यातच शासनाकडून ध्वज दिनाचा निधी जमविण्याचे काम! तलाठी हे काही स्वतःच्या पगारातून ध्वजदिनाचा निधी जमा करत नाहीत. तर येणार्‍या शेतकर्‍याला उत्पन्नाचे दाखल्यावर सही करण्यासाठी पालक वर्गाकडून निधीचे संकलन जमा केले जाते. त्याशिवाय त्यांनी एखादा कारकून कामासाठी ठेवलेला असतो त्याला देण्यात येणारे मानधन हे तेथे येणार्‍या प्रत्येक शेतकर्‍यांच्या खिशातूनच भागवले जाते. सातबारा संपला की आपले जीवनच संपले असे बळीराजाला मनापासून वाटते. शेतकर्‍याचे जीवनच अंथरुन पांघरुणाखाली असते. सातबारा तुकडा शेतकर्‍याच्या हाती पडला म्हणजे तलाठी भाऊसाहेबांनी आपल्यावर मेहरबानी केली अशी शेतकर्‍याची भावना होती. काही वेळा शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांचे अंगठे घेऊन जमीनीही हडप केल्या गेल्या. असा हा सातबारा आता प्रत्येक भुधारकाला सुलभ होणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णय ही महसूल क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल. 
      जमीनीची ओळख व मालकी सांगणारा आरसा तलाठ्यांकडे  २१ प्रकारचे गाव नमुनेमध्ये समाविष्ठ असतात. त्यापॆकी यात सात बारा हे दोन नमुने सातमध्ये समाविष्ट असतात. जमीनीवर कर्ज, मालक,  क्षेत्र, लागवडीखालील क्षेत्र व पोट खराबा, जमीनीवर कोणाचा हक्‍क आहे का, जमीनीवर कर्ज आहे का? नमुना १२ मध्ये कोणत्या हगामात कोणते पिक वा घटक, पाण्याची सुविधा याची माहिती असते. या दोन्ही नोंदी म्हणजेच सातबारा उतारा! तलाठ्याने दिलेल्या अस्वच्छ अक्षराने 'ध चा मा' होत असल्याने संगणकीकरण करण्यात आले. आता त्यामध्ये काही सुधारणा करत देान सप्टेंबरला तो सुलभ  सोपा केला गेला.
          या सोप्या केलेल्या सातबारामध्ये कोणाच्याही दारात खेटे न मारता आता तो १५ रुपयात तलाठ्याच्या डिजीटल स्वाक्षरीसह मिळणार आहे. यामध्ये वरच्या बाजूला शासनाचा लोगो व महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वाटरमार्क असणार आहे. गावाच्या नावाबरोबर एक कोडनंबर असेल आणि लागवडी लायक व पोटखराबा या क्षेत्राची एकत्रित बेरीज असेल. पूर्वीच्या सातबारात मयत खातेदार, क्षेत्र विक्री केलेले खातेदार, कमी केलेले कर्ज या नोंदीसाठी आता आडवी रेघ दिसेल. खातेक्रमांक आणि इतर हक्‍क हे मालकाच्या नावासमोर असतील. जमीन मालक एका पेक्षा एक असतील तर दोघांच्याही नावात आडवी     रेघ मारली जाईल. शेती व बिनशेतीसाठी त्या वेगवेगळ्या स्वरुपातील उतारे असतील बिनशेती उतार्‍यात पिकाबद्दल माहिती नसेल शेतकरी हेक्टर आर चौरस मीटर व बिनशेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर एकत्र दाखवते जातील. प्रलंबीत फेरफार उतार्‍यावरच दिसतील, नवीन जुन्या फेरफार कधी झाल्या तो क्रमांक व तारीखही नमुद केलेली असेल.
      शेतकर्‍याचा सातबारा सोपा झाला  हे शेतकर्‍याच्या दृष्टीने चागलेच झाले. यामुळे त्यांनी वॆयक्तीक किंवा जामीनकीवर कर्ज  मिळण्यास सोपे जाईल. बॅकेला पण कर्ज दतेाना हात आखडते घ्यावे लागणार नाहीत. परतूं आपण कर्ज घेतो त्यावेळेस या आपल्या उतार्‍यावर बोजा चढवला जातो. तो आपण व्यवस्थीत परंत फेड केल्यास तुम्हाला नवीन कर्ज घेतांना अडचण येणार नाही.
       परंतू कर्ज फेड न झाल्यास आपली मालमत्ता  बँकेला आता  ताब्यात घेण्यास अडचण भासणार नाही. त्याच बरोबर  जमीनदारांचेही असेच  होणार आहे. तरी जरुरी पूरतेच कर्ज घेऊन आपला उद्योग चालवावा.इ नाही तर तलाठ्याच्या दारात खेटा मारणे चांगले होते अशी भावना होईल!


                    लोकनिर्माण,


         संपादक - बाळकृष्ण कासार