मागील काही महिने पुनः नजरेखालून घातले तर असे दिसून येते की येणारे काही महिनेच नाही सर्व अनेक वर्षे बेरोजगारीमुळे उपासमारी, खून, दरोडा, हिंसा अशा अनेक गंभीर प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी तुमचा आमचा खिसा खाली असणार आहे.१५-१५ लाख मिळण्याचे स्वप्न पायदळी तुडवण्याने पैसे कमवायला प्रत्येकाला बाहेर पडावे लागेल. मात्र आता आता बाहेर पडायलाही भीती वाटत आहे.बाहेर पडलो तरी काम नाही. ज्यांनी टिकवले तेच नोकरीवर टिकून आहेत.कोरोनाच्या भीतीने गावी गेलेल्या समस्त मुंबईकरांना आता नोकरी मिळवण्यासाठी पुढील काही महिने तळवे झिजवावे लागणारच.नाहीतर मिळेल ती नोकरी करून मुकाट्याने जगावे लागणार.मार्केट मध्ये पैसा नाही,पैसा कमवायला माणसे नाहीत, माणसे आहेत पण पैसा देणाऱ्या कंपन्या सुरू नाहीत.सामान्यांनी जगायचं कसं? ह्या मुंबई शहरात भाड्याने राहणाऱ्या लोकांची संख्या असंख्य आहे.घरभाडे कमीतकमी दहा हजारावर सुरू आहे.आता ह्या परिस्थितीत दहा हजाराची नोकरी मिळणे मुश्कील झाली आहे तर घरभाडे सोडून द्या.लाईतबील भरमसाट येत आहे.कसे होणार पुढे?
आमची मीडिया आमचे नेते, पुढारी सुशांत सिंग,कंगना, रिया ह्यात २४/७ व्यस्त. इथे एक मुलगी लग्नासाठी पाहण्यासाठी हजारो चौकश्या केल्या जातात.आमचा सुशांत २-२ मुलींसोबत प्रेम करत होता, मीडिया उघड उघड सांगतेय, तरी हा विषय ओढला जाऊन सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर कुलूप लावण्याचे काम जोरदार सुरू आहे. इथे पोटासाठी मारामारी सुरू आहे,नोकरी नाही आणि इकडे राजकीय पार्टीत मोठ्या भरत्या सुरू आहेत. कोणी काहीही म्हणा तुमच्या मतांशिवाय तुम्हाला कोणतं कुत्र ही विचारत नाही ही वस्तुस्थिती झाली आहे.सुशांत सिंग जर देशाचा प्रश्न असेल तर मग आता तो हयात नसताना त्यांने देशातील नागरिकांकडून कमविलेला पैसा त्याच्यानंतर टाका की वाटून गोरगरिबांना.होईल असे? कंगणाला जर समाजसेवा करायची एवढीच हौस असेल तर का कोण्या एका राजकीय पक्षात जायला हवे? मग इतके नखरे करायची गरजच काय? सरळ सरळ प्रवेश करून राजकीय जीवनात हिरोईन म्हणून डौलात नंदावे.आमची गावी गेलेली पोरं डोक्यावर वजन घेऊन मिळेल तो व्यवसाय करत आहेत.(पर्याय म्हणून) निदान आधीपासूनच व्यवसाय सुरू असते तर आज उपासमारीची वेळ आली नसती.
काल पर्वाचे सन्मा.प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत ऐकत होतो, ते सांगत होते की लॉकडाऊन हळूहळू ओपन करा(योग्य ठिकाणी) नाहीतर लोकं उपासमारीने माणसे मरतील. एक सुंदर उदाहरण दिले की मच्छीमार समाजासाठी तलावांची परवानगी द्या.अनेक लोकं जगतील आणि अनेकांना रोजगार देतील.आणि ते सत्य आहे.खरे सांगायचे झाले तर ह्या १०-१२ हजारांच्या नोकरीत दम राहिला नाही. पण आता उद्योग सुरू करायला ही भांडवल नाही. गावात वापस जायचं तर गावात कोणी घेत नाही.स्वतःचा बाप जरी दगावला तरी त्याला पाहायला कोणी जवळ येऊ देत नाही मुंबईतुन जाऊन सुद्धा.आज कोरोना आहे उद्या परवा जाईल पण जोडलेली माणसे,इतक्या वर्षाची नोकरी, इतक्या वर्षांची माणुसकी मातील मुरत जात आहे. पैसा सर्वकाही नाही म्हणाऱ्यांसाठी पैसाच सर्वकाही आहे हे आतामात्र पटले असेल कदाचित.
आज प्रत्येक गोष्टींचे भाव वाढलेत मात्र शेतकऱ्यांना भाव कधीच मिळत नाही.फक्त बोलायचं की भारत हा कृषीप्रधान देश आहे.पण शेतीत राबराब राबणारा कुपोषित होऊन जगतोय.बडे बडे देश लुबाडून गायब आहेत मात्र इथे एक दोन हजारांचे हफ्ते थकले तर फोन वर फोन सुरू होतात,धमक्या मिळतात. ह्या कोरोना महामारीत मदत केलेल्या समस्त ज्ञात अज्ञात समाजसेवकांना मनाचा सन्मानाचा नमस्कार आणि अभिनंदन धन्यवाद. देश पुनः जगेल फक्त जगायचं कसं तो मार्ग सरकारने योग्य रीतीने आणि योग्य वेळी दाखवून द्यावा अन्यथा उपासमारीने बळी जायला वेळ लागणार नाही.
तुषार गौतम नेवरेकर
दापोली, रत्नागिरी
7218467963