सं - पा - द - की - य -*       *कोरोनाला आली करुणा!

 


     कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर सरकारने सुजीवन सुस्थितीत चालविण्यासाठी येन केन प्रकारे उपाय योजना करुन सध्या अर्थिक कोेंडीत असणार्‍या सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. वास्तविक सरकारने केलेल्या लॉकडाऊन आणि उपाययोजना यामुळे अनेक ठिकाणी कोवीड हाॅस्पीटलची निर्मिती झालेली आहे. म्हणून कोरोनावर नियंत्रण राखता आले. नाहीतर आज वेगळी परिस्थिती पाहावयास मिळाली असती. जनता या लॉकडाऊन मुळे त्रस्त झाली असली तरी सरकारने  गंंभीरपणे जनतेला काही प्रमाणात सुटकेचा दिलासा दिलेला आहे.
     हा संसर्गच असा आहे की, त्याला गर्दीचे ठिकाण फार आवडते आणि आपल्याला पण गर्दी शिवाय पर्याय नाही. आज शासनाने रेल्वे बंद केली असली तरी उद्या भविष्यात रेल्वे चालू होईल त्यावेळी रेल्वेला प्रवाशी उपलब्ध झालेले असतील. कारण कोरोनाची तिव्रता त्यावेळस कमी प्रमाणात झालेली असेल. तरीही हे लॉकडाऊन कोरोना करत नसून सरकार करत आहे. त्याला जमाव बंदीपासून दूर ठेवायचे आहे. आज मंदीरे, मस्जिद, चर्च बंद आहेत. तेथील कर्मचार्‍यांचे उत्पान्न बुडाले आहे. तरी या कर्मचार्‍यांनी आणि भक्‍तांनी पण विचार करावयास पाहिजे की, या कोरोनापासून देवच दुर  गेलेला आहे, तर आपणास कोणते दॆव वाचविणारे आहे! आज हाच ईश्‍वर सरकारच्या माध्यमातून  लोकांना आपले दर्शन घेण्याकरीता प्रतिबंध करत आहे. आपण पुराणात बर्‍याच कथा वाचलेल्या किंवा ऐकलेल्या असतात की, इश्‍वराने दिलेले नियम पाळण्यास कसूर केल्यानंतर देवाचेही काही चालत नाही, ती परिस्थिती हळू हळू सुरु करण्यासाठी कोणाच्या तरी रुपाने देवाचा देव हा प्रगटत असतो. कदाचीत आपण केलेल्या दुष्कर्मीची फळे आपल्याला जो पर्यंत भोगता येत नाहीत तो पर्यंत ही परिस्थीती अशीच राहणार यात वाद नाही आणि आणि संपूर्ण विश्‍वही परिस्थितीला सामोरे जात आहे.
      राज्य सरकारने अनलॉक ४ हे चालू केल्यामुळे आंतरजिल्हा प्रवास खुला झालेला आहे. हॉटेल्स, लॉज, खाजगी बस, मिनीबस, आंतरराष्ट्रीय विमान प्रवास असे शासनाच्या निर्देशानूसार चालू केलेले आहे. परंतू हे करतानाच आपण आपली सुरक्षितता स्वतःलाच करावयाची आहे. गेली सहा महिने आपण त्याची शिकवण घेतलेली असल्यामुळे आपल्यावर आज ती बिंबवली गेली असल्यामुळे आता लॉकडाऊन जरी उद्या उठला तरी 'आजचा कोरोना, उद्याचा महाकाय करोना' होऊन कदाचित येईल याचे आपण भान राखून आपल्या कुटूंबाची आणि आपली सुरक्षा राखण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले तर ते वावगे ठरणार नाही!ं
                      ********
लोकनिर्माण,
संपादक - बाळकृष्ण कासार


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image