कोरोनाचे रूग्ण घटल्याने वेळणेश्‍वर कोविड सेंटर बंद

 


गुहागर /प्रमोद आंब्रे


    कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यानंतर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तालुक्यातील वेळणेश्‍वरमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू करण्यात आले होते. सध्या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या घटल्याने तालुका प्रशासनाकडून हे सेंटर गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. दरम्यान यापुढील कोरोना रूग्णांवर आता दापोली येथील कृषी विद्यापीठामधील सेंटरवर उपचार केले जाणार आहेत.