रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर दिनांक ७ ते २९ एप्रिल एस एम जोशी विद्यानिकेतन, नवनिर्माण शिक्षण संस्था मिरजोळे रत्नागिरी येथे सुरु आहे. विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग लाभला असून कोविड नंतर प्रथमच हे शिबीर होत आहे.
या शिबीराच्या समारोप सोहळ्याला जेष्ट विचारवंत प्रा. संजय मंगो यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबीरातील मुलांचा अद्भूत अनुभवाचा आनंद आणि ज्ञान ही एक वैचारिक पर्वणीच रत्नागिरीत अनुभवण्यासाठी उद्या २९ एप्रिल २५ सायंकाळी ४ वा. सहभागी व्हा!असे आवाहन आणि आग्रहाचे निमंत्रण अभिजित हेगशेट्ये यांनी केले आहे.