प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे ठाण्याच्या दांपत्याने सिद्ध करुन दाखवले

मुंबई /लोकनिर्माण ( गणेश तळेकर) 


             


      प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे ठाण्याच्या दांपत्याने ने सिद्ध केले आहे. तेजस्विनी ही कोंकण ची कन्या असून तेजस हा सातारा येथील आहे.हे दोघे ही मेकॅनिकल इंजिनिअर असल्यामुळे दोघांना एकमेकांची साथ खूप चांगली लाभली आहे.दोघे ही इंजिनिअरिंग कॉलेज ल प्रोफेसर असून त्यांची द्विज  नावाची एक अकॅडमी आहे.त्यामध्ये ते ५ वी पासून आयआयटी फाऊंडेशन, JEE,NEET, DIPLOMA, DEGREE यांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
     तेजस्विनी यांनी lockdown ला positive दृष्ट्या घेऊन ultrasonic machining process या विषयावर  इंटरनॅशनल रिसर्च पेपर सबमिट केला. तसेच त्यांनी गणितामध्ये Numerical methods, Mathematics in daily life and Study of Indian Mathematician या विषयावर देखील  इंटरनॅशनल रिसर्च पेपर सबमिट केला. तेजस्विनी यांनी त्यांच्या नवऱ्याची साथ घेऊन इंजिनिअरिंग मधे मुलांचे ग्राफिक्स या विषयामध्ये आवड कशी वाढवता येईल यासाठी how to encourage the students interest to engineering graphics, Methods and application of Ellipse, Parabola and Hyperbola या विषयावर देखील इंटरनॅशनल रिसर्च पेपर सबमिट केला.
     एका क्षेत्रातील नवरा बायको चांगला संसार करू शकत नाही असे म्हणतात पण तेजस्विनी तेजस या दांपत्याने दाखवून दिले की एका क्षेत्रातले नवरा बायको चांगला संसार नाही तर एकमेकांच्या सहाय्याने स्वतःच्या क्षेत्रामध्ये उत्तम स्थान मिळवू शकतात. सावंत आणि घोडके या दोन्ही आई वडिलांचा भक्कम पाठिंबा, आशिर्वाद आणि साथ असल्यामुळे हे दोघे उंच भरारी घेऊ शकतात असे या दोघांनी लोकनिर्माणच्या  प्रतिनिधींसी बोलतांना सांगितले.