रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय कापडगाव येथील जागेवर उभारण्याचा प्रस्ताव


रत्नागिरी /सुुुुुनील जठार
       रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय दांडेआडोम आणि कापडगाव येथील २५ एकर जागेवर उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दोन दिवसांत पाठविण्यात येणार आहे. हे महाविद्यालय जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात सुरू करण्यात येईल, त्यासाठीचा करार तत्काळ केला जाणार आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १०० जागांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरणासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते.वेळी डॉ. विजय शेगोकार, डॉ. शैलेद्र जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे उपस्थित होत्या. महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाबरोबर जागेचा करार करणे, मेडिकल कौन्सिलकडे पाठवून तो मंजूर करून घेणे यासाठी डीन म्हणून अधिकारी नेमण्यात आला आहे.