*- सं - पा - द - की - य -* - हाथरस सारख्या घटना टाळण्यासाठी प्रशासन व्यवस्था सक्षम होणे गरजेचे!

 


                     दिनांक - ८/१०/२०२०


 


*'बेटी बढाव, बेटी पढाव'* हे आपल्या पंतप्रधानांनी दिलेले घोषवाक्य पालकांना समजले आहे. परंतु मुलगी वाढवून आणि शिक्षण देवून आज जर हाथरस सारख्या  घटनेचा विचार केल्यास कोणता पालक मुलींना वाढवून शिकवून मोठे करेल.  हाच प्रश्‍नचिन्ह सामान्य नागरिकांना पडत आहे! कोणत्याही समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी होते. ते या *'बेटी बढाव, बेटी पढाव,* या घोषवाक्याने जनजागृती होऊन मुलींची संख्या चागल्या प्रमाणात वाढली. मात्र अशा घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. निर्भयासारख्या घटना घडत असताना त्यावर अंकूश ठेवण्याचे शासनाला अपयश आलेले आहे. याला कारण ही पितृसत्‍ताक पध्दत जुन्या चालीरिती त्याच बरोबर धार्मिक शिकवण आहे की, मुलींने घराबाहेर पडू नये. *याउलट मुलीने  घराबाहेर पडण्यासाठी क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरु केली. मुलगी शिकली तर कुटूंब, राज्य व देश प्रगतशिल होतो असा स्रियांना दिलेला अधिकार हा आपणास संविधानात पाहायला मिळतो.*
     आज दररोज शेकडो महिला व मुली या विनयभंग, अनैसर्गिक संभोग, सामूहिक बलात्कार, बलात्कार, अपहरण करुन विकणे, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास, सायबरगुन्हे अशा प्रकारचे गुन्हे घडत असतात. स्त्रियांच्या संरक्षणासाठी कडक कायदे केलेले आहेत. त्यामध्ये सर्वात भयंकर गुन्हा बलात्कार आहे. बलात्कार म्हणजे स्त्रियांच्या तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध लादणे, लग्‍नाचे अमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवणे आणि लग्‍नानंतर पतीकडून होणारा बलात्कार व कुटूंबातील जवळच्या व्यक्‍तीकडून घेण्यात येणारा गॆरफायदा याचे ९७ टक्के प्रमाण आहे. तीन टक्के बलात्कार हे अज्ञात व्यक्‍तीकडून, पाच ते साठ वर्षापर्यंतचा महिलांवर  होतात. या सर्व प्रमाणात १२ ते ३० वयोगटातील स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये गुन्हेगारांना जास्त शिक्षेची तरतूद असलेला खटला सत्र न्यायालयात चालतो. न्यायालायात असे खटले बरेच वर्ष प्रलंबित आहेत. गुन्हेगार जरी तुरुंगात हवा खात असला तरी पिढीता  ही पूर्णपणे खचुन गेलेली असते.  त्यांना कुटूंब, मित्र नातेवाईक स्वयंसेवक संस्था यांच्याकडून धीर दिला गेला पाहिजे. काही महिला इज्जतीसाठी तक्रार करायला पूढे येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे. त्यांनी याबाबत बिनधास्तपणे वडीधारे आणि पोलिसांना सांगितले पाहीजे. तसे केले  नाही तर मुलींचा विरोध नाही असा अर्थ गुन्हेगार वा तिच्या जवळचा मित्र वा नातेवाईक यांना समजून गैरफायदा उचलत असतात.
      भिंन्नलिंग माणूस कसा वागतोय हे मुलींना  *सिक्स्थ सेन्सने* कळत असते याचा उपयोग मुलींचे केल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. विनयभंग प्रकारणात २४ तासात आरोपत्र दाखल करायचे आदेश असल्यामुळे खटले लवकर चालून गुन्हेगारांना तीन वर्षा पर्यंत शिक्षाही  झालेली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी भारत *सरकारने तातडीने मदत मिळण्यासाठी ११२ क्रमांक दिले आहे. तर सायबर गुन्हे टाळण्यासाठीwww.cybercrime.gov.in  या संकेत स्थळावर निनावी तक्रार करता येते. १५५५२६० या हेल्पलाईन वर सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संपर्क साधता  येतो.*
      हाथरस मधील घटनेने संपूर्ण भारतात देशाची संतापाची लाट उसळली आहे. बलात्कार केल्यानंतर मुलींचे शव हे तिच्या कुटंबाच्या स्वाधीन न करता पोलिसांनी या मुलीच्या शवावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. मिडीया मात्र यावेळेला पोलिसांना जाब विचारत असताना पोलीसही आपल्या बळाचा वापर करत होते. याला कारण तेथील सरकार व प्रशासन आहे. सरकारच्या ग्रह विभागाच्या  संमतीशिवाय पोलिस  प्रशासन चालत नाही. शेवटी जनआंदोलन झाल्यानंतर योगी सरकारने पोलिसांना निलंबित केले. हे निलंबनही त्यांनी यावेळेस का केल? यांचा विचार सरकारने करावयास पाहिजे. *घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री-पुरूष समतेचा उल्लेख   केलेला आहे.* स्त्री-पुरूष  समानता होण्यासाठी आता महिलांना पूढे येण्याची गरज आहे. आपल्या कूटूंबाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन आता आपण या युध्दात उतरले पाहिजे. त्याच बरोबर 'बेटी बढाव, बेटी पडाव' या घोषणेची अंमलबजावणी अधिक प्रमाणात  होण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने *प्रत्येक घरात आपली आई आणि बहिण आहे. त्यांच्यावर अत्याचार झाल्यास आपण गप्प बसणार का?* त्याच प्रमाणे ईतर *महिला व मुलींकडे बघण्यात आपलीच आई-बहीण व मुलगी आहे याचे घराघरातून जो पर्यंत संस्कार होत नाही तो पर्यंत आपले कुटुंब सुरक्षित असणार नाही.* जाती- धर्म हे त्याकाळी मनुवाद्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केले होते. ते मनुवादी अजून डोके वर काढत असतांना दिसत आहेत. त्यांना भारतीय संविधान नको आहे. कारण त्या संविधानामध्ये कायद्याची भिती आहे. म्हणून *आपण  जात, धर्म, उच्च, नीच, वर्ण -भेद असे भेदभाव न करता आपण सर्वप्रथम आता मानव वंशाचे असून सर्व प्रथम आपण भारतीय असून संविधान हा आपला लोकशाहीचा धर्मग्रंथ* आहे. त्याचे वाचन आणि पालन करणे हेच आपले कर्तव्य समजल्यास प्रशासन सक्षम होण्यास मदत होईल.त्यानंतर  असे अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांना पायबंद बसून भविष्यात हाथरस सारख्या घटना घडणार नाहीत!


         लोकनिर्माण,


संपादक - बाळकृष्ण कासार
               ★★★


Popular posts