मुंबईतील प्राचीन गुंफा मंदिर - जोगेश्वरी लेणी

             


       जोगेश्वरी लेणी हे भारतातील मुंबईच्या जोगेश्वरी उपनगरात असलेल्या भारतातील सर्वात जुन्या हिंदू गुंफांचे मंदिर आहे.
इतिहासकारांच्या मते जोगेश्वरी ही भारतातील सर्वात जुनी हिंदू लेणी आहे.आणि एकूण लांबीच्या दृष्टीने सर्वात मोठी आहे.           या गुहांच्या जागेच्या मुख्य सभागृहामध्ये लांबट पायऱ्यांच्या मार्गाने प्रवास होतो.गुहेत बरेच खांब आहेत आणि शेवटी एकलिंगम आहे. दत्तात्रय व हनुमानाची मूर्ती आणि गणेश रांग व द्वारपालाचे अवशेष आहेत. येथील प्राचीन गुंफेमध्ये असणाऱ्या जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव मध्ये दुरहून भाविक येतात.नवरात्रीच्या दिवसांमध्ये सकाळी व संध्याकाळी देवीची आरती होते.अष्टमीच्या दिवशी येथे होमहवन करण्यात येतो. गुंफेच्या मधोमध असणाऱ्या गाभाऱ्यामध्ये आई जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे.
दरम्यान पुरातत्व विभागाच्या माहिती नुसार ई.स पूर्व पाचव्या किंव्हा सहाव्या शतकामध्ये शिवपार्वती पूजनासाठी ही प्रचंड गुंफा कोरण्यात आली.या देवी वरूनच या विभागाला जोगेश्वरी असे नाव देण्यात आले आहे.  *कु. रुणाली राजेंद्र पांचाळ.*
*जोगेश्वरी( पूर्व).*
*मुंबई.*


Popular posts
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image