नवरात्रीच्या नऊ नारी
आहेत लय भारी
पहिला मान
आपल्या ह्रदयी आईला
तिने शिकविले *बोलायला*
दुसरा मान
आपल्या क्रांती ज्योती सावित्री बाईला
तिने शिकविले *लिहायला*
तिसरा मान
आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेला
तिने शिकविले *न्याय करायला*
चौथा मान
आपल्या त्यागमुर्ती रमाई मातेला
तिने शिकविले *त्यागातून प्रोत्साहन द्यायला*
पाचवा मान
आपल्या संतमाता लोनाई मातेला
तिने शिकविले *समानतावादी राहायला*
सहावा मान
आपल्या झाशीची राणी लक्ष्मीबाईला
तिने शिकविले *अत्याचाराशी लढायला*
सातवा मान
आपल्या ऑफिस बाॅस मॅडमला
तिने शिकविले *वेळेवर यायला*
आठवा मान
आपल्या सर्व शेजारणीला
तिने शिकविले *सहकार्य करायला*
आणि शेवटचा नववा मान
समस्त सर्व पत्नीला
तिने शिकविले *तडजोड करायला*
नसे आम्हास ओढ नऊ रंगाची
आम्हास जिज्ञासा नऊ विचार एकत्र येण्याची
आहेत हे नऊ मंत्र
जगण्याचे सुयश तंत्र
समस्त नारी शक्तीला सलाम !! 🙏
~@ विलास देवळेकर