संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द जिल्हा परिषद गटाचा मुंबईत महाराष्ट्र सैनिक संवाद मेळावा.  येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसेची जोरदार मोर्चे बांधणी सुरू !!

 


देवरुख/लोकनिर्माण (संदीप गुडेकर )


    रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द जिल्हा परिषद संपर्क अध्यक्ष श्री विजय करंबेळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .आपल्या राजकीय जबरदस्त अनुभव प्रमाणे श्री संजय माईन साहेबानी  तसेच श्री सुनील गणपत करंबेळे साहेबानी गावच्या असणाऱ्या तळमळीमुळे गावच्या विकासासाठी भविष्यात ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आरटीआय सारखी जमेची बाजू चा आधार घेत ग्रामीण भागातील समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे असे नमूद केले. नंतर  घोलम उपशाखाध्यक्ष अंधेरी यांनी आपल्यातील संपर्क वाढण्यासाठी मुंबईहून गावी गेल्यावर आपण एकमेकांच्या गावी येऊन जाऊन संपर्क वाढवायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली.ज्या ग्रामपंचायत मनसे लढविणार त्यांना ग्रामपंचायत पुस्तिका देण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित महिला रणरागिणी महाराष्ट्र सैनिक सौ वृषालीताई सावंत यांनी ज्यावेळी महिलांची उपस्थिती असेल त्यावेळी आपण नक्कीच आपले मनोगत व्यक्त करू असे सांगितले. ऍड अजय पाटील  यांनी ग्रामपंचायी बद्दल प्रशासकीय मार्गदर्शन केले. 


       


      संगमेश्वर मनविसे संपर्क अध्यक्ष दिनेश मांडवकर यांनी भविष्यात आपले मनसे संघटन गावोगावी बळकट झाले पाहिजे यासाठी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांची विभागवाईस मिटिंग घेण्याचा धडाका लावूया असा निश्चय केला आहे.  मनसेचे  विभाग अध्यक्ष  अमित रेवाळे यांनी ग्रामीण भागातील समस्या आणि भविष्यातील ग्रामपंचायत निवडणुका पाखाडी आणि पाणी यापलीकडेही गावचा विकास आहे त्यावर आपण भविष्यात लक्ष केंद्रित केले पाहिजे, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपण प्रत्येकाने आपल्या गावात मनसेचे पॅनल किंवा काही तडजोड करून मनसे सदस्य निवडून आणण्यात भर दिला पाहिजे आणि भविष्यात जे आपले ग्रामपंचायत सदस्य निवडून येतील त्यांना घेऊन आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट नक्की घेऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.तदनंतर कार्यक्रम चा समारोप करण्यापूर्वी अध्यक्षीय भाषणात विजय करंबेळे यांनी  मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आपण  यापुढे अजून जोमाने काम करू आणि आपल्या जिल्हा परिषद गटाचे नाव आपल्या तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे विशेष अस्तित्व असणारा जिल्हा परिषद गट बनवून दाखवू असा ठाम विश्वास व्यक्त केला.या मिटींगला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे विशेष आभार तसेच ही सभा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आणि मनसे पदाधिकारी यांचे विशेष आभार मानले.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image