श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन


खेड/ लोकनिर्माण ( प्रकाश खेडेकर )तालुक्यातील सुकीवली गवळवाडी गावातील रहिवासी श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे ३१/३/२०२३ रोजी अल्पशा आजाराने  निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ६७ वर्षाचे होते.

       त्या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. सामाजिक क्षेत्रात त्या हिरेरीने भाग घेत असत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यांच्या अंत्ययात्रेला मुंबई, दापोली आणि खेड तालुक्यातून त्यांचे अनेक हितसंबंधीय आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

       त्यांचे उत्तरकार्य बुधवार दिनांक १२/४/२०२३ रोजी  सुकीवली गवळवाडी येथील राहत्या घरी होईल.