२६ नोव्हेंबर २०२०
डॉ. बाबासाहेबांचे योगदान
सर्वांच्या कर्तव्याचे भान
सर्वांना संधी समान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || १ ||
सर्व कामगारांची जान
सर्वांना हक्क समान
देशातल्या स्त्रीयांचा सन्मान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || २ ||
दंडाधिकाऱ्यांचा पान
ना कोणाचा अपमान
प्रत्येक नागरिकाला मतदान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || ३ ||
आपल्या भारताची शान
आपल्या लोकशाहीला मान
प्रत्येकाला स्वत:चा अभिमान
अर्थात आपल्या भारताचे संविधान || ४ ||
*सं* कल्प आधुनिक भारत बळवंत करण्यासाठी
*वि* विध जातीला एकत्र आणण्यासाठी
*धा* र्मिक समानता राबविण्यासाठी
*न* गण्य विचारांना हि प्राधान्य मिळण्यासाठी
*भारतीय संविधान* चिरायू होवो, हि सदिच्छा ! 👍
सर्व भारतीयांना ७१ व्या *संविधान दिनाच्या* हार्दिक शुभेच्छा !! 🌹
~@ विलास देवळेकर 🙏
नागरिक क्र. २७
*भारतीय संविधानानुसार*