विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वेलदूर शाखेत सोने व्यवहारात १४ लाख६३ हजाराची फसवणूक, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 


गुहागर /लोकनिर्माण (विनोद जानवलकर)
 


      रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सोनाराने संगणमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या  आरोपावरून संजय फुणगूसकर  मिलिंद जाधव, मनोहर धूमे , गणेश कोळथरकर ,  सुलोचना पावसकर, शबीया परबुलकर  ,विक्रांत दाभोळकर, राजेश भोसले, विनया दाभोळकर  राहणार वेलदूर तालुका गुहागर
 अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत विदर्भ कोकण बँकेचे वेलदुर शाखेचे मॅनेजर  मकरंद पत्की यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की आरोपी संजय फुणगुसकर याने सोन्याचे खोटे दागिने खरे दाखवून तसेच ते खरे असल्याचे  खोटे मूल्यांकन केले यातील इतर आठ आरोपींची संगनमत करून हे खोटे दागिने खरे दागिने दाखवून बँकेकडे गहाण ठेवून वरील सर्व आरोपीने बँकेची १४लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले व बँकेची फसवणूक झाली त्यामुळे या सर्व नऊ आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार गुहागर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे हा प्रकार गेल्या वर्षभरात घडला होता.


Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image