मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी
दिनांक २ जून २०२३ रोजी नाटळ ता. कणकवली येथील रहिवाशी, सध्या मालाड मुंबई येथे वास्तव्यास असलेले, लक्ष्मण वि. तावडे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले.
कै. लक्ष्मण वि. तावडे हे सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित मुंबईचे उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, मौजे नाटळ खांदार वाडी - दुबलेश्वर वाडी शिक्षण संस्था मुंबईचे अध्यक्ष अशा महत्वाच्या पदांवर प्रामाणिक व शिस्तबध्द काम केले. तसेच बराच काळ, त्यांनी वृत्तपत्रात लिखाण केले. शांत सुस्वभावी व अभ्यासु असलेल्या कै. लक्ष्मण तावडे यांनी, क्षत्रिय तावडे मराठा हितवर्धक मंडळ मुंबईचे सरचिटणीस व सल्लागर म्हणून काम पहिले होते. त्यांचे हे कार्य पाहून महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी, स्पेशल एक्सीक्युटीव मॅजिस्ट्रेट म्हणुन त्यांचा गौरव केला होता.
कै. लक्ष्मण तावडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.