चिपळूण एसटी स्थानकाची नवीन निविदा अखेर प्रसिद्ध - शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या लढ्याला यश

 


देवरुख /लोकनिर्माण (संदीप गुडेकर) 


 केल्याने होतंय रे...हे शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.चिपळूण एसटी स्थानक बांधकामाचा पहिला ठेका रद्द झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात या कामाची नवीन निविदा काढण्यात आली आहे.आज सोमवारी ही नवीन निविदा प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये स्थानिक ठेकेदारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संदीप सावंत यांनी केले आहे.
      चिपळूण येथील एसटी स्थानकाचे काम गेले कित्येक वर्षे ठप्प पडले होते.हे काम सुरू करा म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी एसटी प्रशासनाकडे तगादा लावला होता.मात्र संबंधित ठेकेदार एसटी प्रशासनाला दाद देत नव्हता.अखेर संदीप सावंत यांनी श्राद्ध आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळे प्रशासन हडबडले.मुंबई ते रत्नागिरी चिपळूण पर्यंत अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती.
     अखेर कामाचा ठेका रद्द करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आणि स्कायलार्क ठेकेदार कंपनीचा ठेका रद्द करून उर्वरित कामाच्या नवीन निविदा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते.यासाठी देखील संदीप सावंत यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.परिवहन मंत्री अनिल परब साहेब,खासदार विनायक राऊत साहेब,माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब, यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या काही दिवसात यश मिळाले आहे.चिपळूण एसटी स्थानक कामाची नवीन निविदा अखेर आज सोमवारी प्रसिद्ध झाली आहे.
      ३ कोटी ६९ लाख ३६ हजार इतक्या रकमेची ही निविदा असून ११ नोव्हेंम्बर पासून ऑनलाइन पद्धतीने निविदा भरता येणार आहेत.यामध्ये स्थानिक ठेकेदारांनी सहभाग घ्यावा आणि स्पर्धा हा हेतू न ठेवता उत्कृष्ट असे काम हा उद्देश ठेवून सर्वसामान्य गोरगरिबांचे हे मंदिर उभे करावे अशी विनंती संदीप सावंत यांनी केली आहे.