चिपळूण खेर्डी परिसरात भुकेने व्याकुळ बिबट्याचा नागरिकांवर हल्ला पण बिबट्याचाही उपासमारीमुळे मृत्यू

 चिपळूण लोकनिर्माण टीम 

चिपळूण खेर्डी परिसरात डोंगर भागात घराच्या सुरु असलेल्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या नागरिकावर भरदिवसा हल्ला केल्याची घटना शिवाजीनगर वरची खेर्डी येथे रविवारी सकाळी. १० च्या सुमारास घडली. मात्र या हल्ल्यानंतरही बिबट्या घरातच बसला होता. विशेष म्हणजे बरेच दिवस शिकार न मिळाल्याने तो अत्यवस्थ असल्याने अखेर त्याचा तडफडून मृत्यू झाला. वनविभागाच्या ध्यमातून या बिबट्याची विल्हेवाट वण्यात आली. वनविभागाने दिलेल्यामाहितीनुसार, शिवाजीनगर वरची खेर्डी येथे डोंगर उतारावरील रमेश बाबू वास्कर (७३) यांच्या मालकीच्या जागेत घराचे बांधकाम चाल आहे त्या ठिकाणी ते आणि त्यांचे जावई विलास कृष्णा धामणस्कर व मुलगा राजेश रमेश वास्कर हे त्या बांधकामावर पाणी मारण्याासाठी रविवारी सकाळी ९.३० ते १० च्या सुमारास गेलेहोते. घरात जाऊन रमेश वास्कर हे फळ्या उचलण्यासाठी वाकले असता त्या ठिकाणी लपून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान झालेल्या आरडाओरडीनंतर बिबट्या तेथून पळून गेला.

त्यानंतर जखमी वास्कर यांना शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील दवाखान्यात आणण्यात आले. उपचारानंतर त्यांचा मुलगा राजेश वास्कर हा पुन्हा त्या घराकडे गेला असता त्यावेळी तो बिबट्या घरातच बसला असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबतची माहिती वनविभागाला कळल्यानंतर मनक्षेत्रपाल राजश्री कीर या आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या लपून बसलेल्या बिबट्याने पकडण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले मात्र बिबट्याच्या हालचाली होत नसल्याचे दिसून आले बिबट्याच्या जवळ जाऊन पाहिले असता तो मृत्युमुखी पडल्याचे आढळले सदरचा बिबट्याच्या मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले.