मुंबई /लोकनिर्माण
राज्यात करोनाबरोबरच वाढत्या वीजबिलाच्या मुद्यांनं उग्र रुप घेतलं आहे. करोना काळात वाढीव वीजबिलं आल्यानं नागरिकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढीव वीजबिलाच्या प्रश्नानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रस्त्यावर उतरत आवाज उठवला असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारविरोधात गर्जना केली आहे. "या सरकारनं वीज देयकांतून जिझिया कर लावून लूट सुरू केली आहे," अशी टीकाही ठाकरेंनी केली आहे.
वाढीव वीजबिलांच्या मुद्यावरून राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनं केलं. यावेळी राज ठाकरेंनी लिहिलेलं निवेदन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या निवेदनात राज ठाकरे यांनी सरकारच्या वाढीव वीजबिलांसंदर्भातील भूमिकेचा समाचार घेतला आहे.