नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल -पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

 


मुंबई /लोकनिर्माण न्युज 


कोरोनामुळे जाहीर झालेला लॉकडाउन ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु असून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहे. बुधवारी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
     विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेवर निशाणा साधला.