अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दौंड तालुक्यातील केडगाव वाखारी येथे वृक्षारोपण करत  वर्धापनदिन साजरा


पुणे-दौंड /लोकनिर्माण (विनायक दोरगे)


      अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संघटनेला 1 नोव्हेंबर २०२० ला २८ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत  संघटनेच्यावतीने वर्धापना निमित्त दौंड तालुक्या मधील केडगाव वाखारी गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.. संघटनेला २८ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने २८ झाडे संघटनेच्यावतीने लावण्यात आली.. 
कोरोना महामारी संकट काळात देखील संघटनेच्या वतीने धान्य भाजीपाला दैनंदिन वापराच्या वस्तु मदत नव्हे कर्तव्य ह्या तत्वार वाटप करण्यात आल्या संघटनेच्या माध्यमातून नेहमी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे. दौंड तालुका कार्याध्यक्ष श्री मंगेशजी रायकर यांनी सांगितले. 


       
      अन्न नागरी पुरवठा मंत्री श्री छगनजी भुजबळसाहेबयांच्या
 मार्गदर्शनाखाली संपुर्ण राज्य मध्ये वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडत असताना  जगामध्ये करोना चे सावट असल्यामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टनसिंग चे पालन करून   कार्यक्रम घेण्यास सांगण्यात आले होते. 
 यावेळी समाता परिषद पुणे जिल्हा महिला अध्यक्षा  सौ ज्योतीताई झुरंगे, पुणे जिल्हा समता परिषद अध्यक्ष श्री अनिलजी लडकत,  दौंडच्या महिला समता परिषद अध्यक्षा सौ मीनाताई धायगुडे, दौंड तालुका अध्यक्ष श्री सचिनजी रंधवे, कार्याध्यक्ष श्री मंगेशजी रायकर, श्री विजय गिरमे, श्री अजय म्हेत्रे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image