ऎन दिवाळीत वीज ग्राहकांना झटका, थकबाकी वसुलीचे महावितरणाला आदेश


मुंबई /लोकनिर्माण न्युज )
कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात वाढीव वीजबिल देण्यात आले असल्याची तक्रार राज्यातील ग्राहकांनी केली आहे. राज्य सरकारकडून वीज ग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा होती. परंतु सरकारने ग्राहकांना झटका दिला आहे. महावितरणाने एक परिपत्रक जारी केले आहे.राज्य सरकारडून वाढीव विजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. परंतु या शक्यता आता मावळल्या आहेत. कारण त्यासंबधी परिपत्रक महावितरणाने जारी केले आहे.
        महावितरणाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, वीजबिल ग्राहकांना टप्प्याटप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
      वाढीव वीज बिलाबाबत सवलत मिळणार नाही.. वीजबिल वसूल करण्याचे महावितरणचे आदेश देण्यात आले आहेत
वाढीव वीजबिलबाबत ग्राहकांना माहीती देण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
     महावितरणाने जारी केलेल्या पत्रकामुळे राज्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलात कोणतही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट ग्राहकांकडून सर्व बील वसूल करण्याचे आदेश महावितरणाने कर्मचाऱ्यांना दिले आहे.