तरुणांना लाजवेल असे व्यक्तिमत्व -जेष्ठ वृत्तपत्र लेखक श्री दादासाहेब शिंदे !        

         


   जेष्ठ वृत्तलेखक आणि दलितमित्र पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री दादासाहेब शिंदे यांचा वयाला ७७ वर्ष पूर्ण होत आहेत. जेष्ठ वृत्तपत्र लेखक दादासाहेब शिंदे यांचा जंन्म १६/११/१९४३ रोजी झाला. त्यांचे वडील आदरणीय महादेवराव शिंदे हे स्वातंत्र्य सैनिक आणि शिक्षक होते तर मातोश्री आदरणीय नलिनीबाई ह्या सुद्धा शिक्षिका होत्या. त्यांच्या संस्काराचा प्रभाव दादासाहेबाच्या आयुष्यावर पडणे स्वाभाविकच होते त्यांच्या प्रेरणेनेच दादासाहेबाना बालपणापासून लेखन व वाचनाचा छंद जडला आणि त्यांनी तो जोपासला सुद्धा. 
दादासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई महानगर पालिकेच्या मराठी शाळेतुन झाले.तर माध्यमिक शिक्षण किंगजार्ज इंग्लिश हायस्कूल मधून आणि महाविद्यालयीन शिक्षण फोर्ट येथील एल्फिन्स्टन कॉलेज मधून झाले. 1962साली ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असताना चीनने त्यावेळेस भारतावर आक्रमन केले होते.त्यावेळीस दिवाळीची सुट्टी असल्याने दादासाहेब आपल्या काकाकडे सांगलीकडे गेले होते.चीनच्या आक्रमनामुळे राष्ट्रीय निधीसाठी सांगलीत आर्थिक मदत गोळा केली जात होती तसेच रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने अनेक लोक रक्तदान करीत होते परंतु दादासाहेब यांच्याकडे त्यावेळेस फक्त दहाच रुपये शिल्लक असल्याने ते निधी राष्ट्रीय कामासाठी देऊ शकले नाही शिवाय अंगाने काडी पहेलवान असल्याने रक्त ही देऊ शकले नाही ही खंत त्यांच्या मनात कुठे तरी राहून गेली. 
    परंतु दादासाहेब यांना त्यांच्या वडिलांनी अकरावी एसएससी झाला म्हणून त्यांना मनगटी घड्याळ गिफ्ट दिले होते. आपण राष्ट्रीय कामासाठी पैसे देऊ शकत नाही, रक्त देऊ शकत नाही पण मनगटावरील घड्याळाचा लिलाव तर करू शकतो या भावनेने ते तडक तिथे उभारलेल्या व्यास पीठावर गेले. व्यासपिठावर उपस्थित असलेल्या राणीसाहेब पटवर्धन यांच्याकडे ते घड्याळ त्यांनी राष्ट्रीय निधीस मदत म्हणून दिले आणि त्या घड्याळाचा तिथे लिलाव केला गेला आणि एका सज्जन शेतकऱ्याने ते घड्याळ २५० रुपयेला ते विकत घेतले आणि दादासाहेबाच्या चेहऱ्यावर देश कार्यासाठी केले गेलेल्या छोटयाश्या मदतीने हास्य फुलले आणि समाधान सुद्धा वाटले. 
१९६८-१९६९ मध्ये हैद्राबाद शहरात महाभयंकर महापूर आला होता त्यावेळेस दादासाहेब आणि त्यांच्या मित्रानी बूटपॉलिश करून जमवलेले चारशे एकवीस रुपये तत्कालीन राज्यपाल महोदय सादिक आली यांना राजभवनात प्रत्यक्ष भेटून दिला त्यांच्या या सामाजिक सेवा भावी वृत्तीचे राज्यपालांनी कौतुक केले.
      दादासाहेब शिंदे रिझर्व्ह बँकेत नोकरी करीत असताना सामाजिक क्षेत्रातही काम करीत असत. लिखाणाची गोडी आणि सामाजिक भान तसेच वृत्तपत्राच्या वाचनाचे वेड  असल्याने दादासाहेबानी आजपर्यंत विविध वर्तमान पत्रातून दहा हजारहून अधीक पत्रे लिहिली आहेत. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय लिखाणा बद्दल दर्पणकार आचार्य  बाळशात्री जांभेकर पुरस्कार, राज्य सरकारचा 1995 साली मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते  भारतरत्न  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र   पुरस्कार, मुंबई पुणे, नाशिक, नागपुर येथील विविध संस्था आणि संघटनांनी अनेक पुरस्कारांनी दादासाहेब शिंदे यांना गौरविले आहे. एवढेच नव्हे तर राज्यपाल डॉ. पी सी अलेकझेंडर, राम नाईक, विद्यासागर राव, सुशील कुमार शिंदे इत्यादी प्रभूती आणि महानुभवानी दादासाहेब शिंदे यांचा सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कामाचा गौरव केला आहे.केवळ महाराष्ट्रानेच नव्हे तर अमेरिकेतील अमेरिकन बायोग्राफ़िकल इन्स्टिटयूटने १९९७ साली दादासाहेब शिंदे यांचा "मॅन ऑफ दि इयर "हा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. 
     समाजासाठी धडपडणारा, तळमळणारा माणुस म्हणून दादासाहेब शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.रिझर्व बँकेत नोकरी करीत असताना चर्मकार समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी व समाज बांधवाना एकत्रित आणण्यासाठी हराळे युवक समाज तसेच भारतीय चर्मकार संघ स्थापून त्याचे अध्यक्षपद भूषविले.त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात समाज बांधवाला आणि संस्थेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.दादासाहेब यांनी  सेवा निवृत्ती नंतर सुद्धा तरुणाला लाजवेल हेवा वाटेल अशी धावपळ करीत सामाजिक कार्यात सहभागी होतात.नुकताच धारावीतील सुनिर्मल फॉउंडेशनने त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि वृत्तपत्र लेखन क्षेत्रात केलेल्या उतुंग कामगीरीमुळे "सुनिर्मल जीवन गौरव पुरस्कार "देऊन सन्मान केला. 
      समाजासाठी आणि वृत्तपत्र लेखकासाठी आदर्श ठरणाऱ्या दादासाहेब शिंदे यांचे १६/११/२०२० रोजी वयाची ७७ वर्षं पूर्ण होत असल्याने सर्व वृत्तपत्र लेखकाच्या वतीने त्यांच्या पुढच्या आरोग्यमय आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा !



      दत्ता श्रावण खंदारे


              धारावी 
        9699313621