महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार

 

 मुंबई लोकनिर्माण (शांताराम गुडेकर )

 महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपला लोकप्रिय MS-CIT कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुसज्ज करत ‘MS-CIT – AI Powered’ या नावाने नव्याने सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रासह देशभरात 1.65 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या कोर्समध्ये आता 100 हून अधिक AI टूल्स व 400 पेक्षा अधिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे.

AI Divide चे नवे आव्हान, MKCL चं स्मार्ट उत्तर..!

          Digital Divide कमी होत असतानाच आता AI जाणणारे आणि न जाणणारे अशी नवी दरी तयार होत आहे. ही दरी भरून काढण्यासाठी MKCL ने हा कोर्स नव्याने तयार केला आहे. ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot यांसारख्या टूल्सचा वापर, सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, डिजिटल व्यवहार, आणि AI वापरून अभ्यासात किंवा कामात कशी मदत मिळवता येईल, याचे प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जात आहे. राज्यातील 4500 हून अधिक अधिकृत केंद्रांमधून हा कोर्स शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. संगणक साक्षरतेबरोबरच नवयुगातील तंत्रज्ञान कौशल्ये देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

           शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, गृहिणी, शिक्षक, व्यावसायिक, स्टार्टअप सुरू करणारे तरुण तसेच नोकरीच्या शोधात असलेले युवक/युवती यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. 10वी व 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनीही ही संधी न गमावता नव्या युगातील पहिलं स्मार्ट पाऊल उचलावे, असे आवाहन MKCL कडून महाव्यवस्थापक नटराज कटकधोंड, मुंबई विभाग समन्वयक इंद्रनील मयेकर यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद मध्ये करण्यात आले आहे.यावेळी mkcl चे विविध पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image