चिपळूण काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

 


चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर)


   येथील काँग्रेसतर्फे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती तालुकाध्यक्ष प्रशांत  यादव यांच्या अध्यक्षतेखाली खेर्डी येथे साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक सुरेश राऊत, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. 


    यावेळी तालुका सचिव नंदकुमार कामत, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष मुबीन आलेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, ज्येष्ठ नेते सयाजी पवार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष संजय जाधव, मुन्ना दळी, सेवादल तालुकाध्यक्ष अश्पाक तांबे, जिल्हा कार्यकारणी सदस्य गुलजार कुरवले, उपाध्यक्ष रुपेश आवले, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपिले,  विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, नगरसेविका सफा गोठे, सेवादल शहराध्यक्ष नंदा भालेकर, तालुका सरचिटणीस बंड्या साळवी आदी उपस्थित होते. 


       


       यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश राऊत व सुरेश कातकर यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. इंदिराजींनी देशासाठी दिलेले बलिदान आपण विसरू शकत नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी,  राहुल गांधी,  प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचे हात बळकट करूया  असा निर्धार उपस्थितीतांनी यावेळी केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image