नोकरीचे आमिष दाखवत दोन मुलींना गोवले अनैतिक व्यवसायात'*, हेल्प फाऊंडेशनच्या पुढाकारामुळे आणि पोलिसांनी घेतलेल्या तत्काळ अॅक्शनमुळे या दोन पिडीत मुलींची सुटका

चिपळूण /लोकनिर्माण 
    एका मोठ्या कंपनीत नोकरीला लावतो असे आमिष दाखवून पश्‍चिम बंगाल येथील अल्पवयीन मुलीसह दोघींना अनैतिक व्यवसायात गोवण्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे उघडकीस आला . हेल्प फाऊंडेशनने चिपळूण पोलिसांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करत त्या दोन्ही मुलींची त्या नराधमांच्या तावडीतून सुटका केली आहे. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात खेर्डी येथील एका भाजीपाला विक्री करणार्‍या तरूणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मोहमंद  शेख असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो सध्या खेर्डी येथे रहात असून त्याचे मूळगांव कोलकाता आहे. खेर्डी येथे भाजी आणि इतर व्यवसाय करत होता. शेख याने पश्‍चिम बंगाल येथे राहणार्‍या दोन मुलींना मोठ्या कंपनीत नोकरी लावतो असे आमिष दाखवून १५ ऑक्टोबर रोजी खेर्डीत ठेवले. मात्र नोकरी न लावता उलट शेख याने त्या मुलींच्या मजबुरीचा फायदा उचलण्यास सुरूवात केली. त्या दोघींवर त्याने लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर अनैतिक व्यवसाय करण्यासही भाग पाडले. काम मिळेल या आशेने त्या सुरूवातीला गप्प राहिल्या. मात्र आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही मुलगी अल्पवयीन आहे.
याबाबतची माहिती चिपळुणातील ज्येष्ठ पत्रकार व हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांना मिळाली. त्यांनी तातडीने खेर्डी येथे पीडीत मुलींची भेट घेतली. यावेळी संस्थेचे सदस्य श्रीधर भुरणही होते. त्या दोन्ही मुलींनी आपल्यावरील शारिरीक व मानसिक अत्याचाराची कहाणी सांगितली. त्यानंतर सतीश कदम यांनी त्यांना धीर व विश्‍वास दिला. त्यानंतर त्यावर तात्काळ कारवाईचा पवित्रा घेत तेथूनच चिपळूणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना या गंभीर प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला बैठक होवून रेस्क्यू ऑपरेशनची तयारी झाली. यात असि. पो. इन्स्पेक्टर वर्षा शिंदे, पीएसआय सागर चव्हाण, पो. कॉं. आरती चव्हाण, पंकज पाडाळकर व आशिष भालेकर ही टीम साध्या वेषात व खाजगी गाडीने खेर्डीकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत हेल्प फाऊंडेशनचे पदाधिकारी होते. सर्वात आधी संशयित आरोपींना पकडायचे ठरले. कारण सतीश कदम यांनी ज्यावेळी त्या पीडीत मुलीची भेट घेवून आले होते त्यानंतर शेख याने त्या मुलींना मारहाण करून धमकी देवून आला होता. त्यांचा मोबाईलही काढून घेतला होता. तो कदाचित पसार होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी सापळा रचून अखेर शेख याला मंगळवारी ताब्यात घेतले. हेल्प फाऊंडेशनच्या पुढाकारामुळे आणि पोलिसांनी घेतलेल्या तत्काळ अॅक्शनमुळे या दोन पिडीत मुलींची सुटका झाली.


Popular posts
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image