उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शिवसेना युवासेना पालघर जिल्हाध्यक्ष धनंजय मोहिते यांच्या युवा प्रतिष्ठान मार्फत भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 


वसई-विरार/लोकनिर्माण (चंद्रकांत गायकर, विनायक खर्डे)


 युवा प्रतिष्ठान, फादरवाडी वसई पूर्व तर्फे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होतं. जगावर कोरणाचं संकट असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे साहेब यांनी रक्तदानसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान केले  होते कारण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा होत आहे त्यालाच अनुसरून या कोरोनाच्या संकटात देखील युवा प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून या शिबिराला जनतेनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सदरची  शिबिर फादरवाडी येथे सेंट जोसेफ हायस्कूल मध्ये ठेवण्यात आली होती.


       


      या शिबिराला  ९६ बॉटल नालासोपाऱ्यातील साथिया ब्लड बँकला  देण्यात आले आहे. साथिया ब्लड बँकेचे सर्व डॉक्टर व नर्स यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवला तसेच समस्त युवा प्रतिष्ठान चे पदाधिकारी व सदस्यांचे योगदान लाभल्याबद्दल धनंजय मोहिते यांनी मनपूर्वक अभिनंदन केले. या शिबिराला युवा प्रतिष्ठानचे सल्लागार रमाकांत भोईर , कार्याध्यक्ष खालिद  शेख, उपाध्यक्ष गणेश वरखंडे ,सरचिटणीस  राहुल ससाने, खजिनदार सविओ फर्नांडिस ,सचिव अमजद शेख, सचिव अक्षय  किणी, उपसचिव सनी पोल, कार्यकारणी सदस्य गजाला शेख,उषा चौहान व सदस्य उपस्थित होते अशी माहिती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष धनंजय मोहिते यांनी दिली.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image