३५ वर्षापासुन मागणी करत असलेल्या पुला च्या कामासाठी १५ ऑगस्ट २०२२ रोजी आमरण उपोषण.

 

रत्नागिरी - लोकनिर्माण/ सुनील जठार


गेल्या ३५ वर्षापासुन मागणी करत असलेल्या पुला च्या कामासाठी सरकार इतके उदासीन आहे. आज पर्यंत शांततेच्या आणि विनंती रुपी मागणीला सरकार दरबारी काहीच किंमत नाही. येणा-या भविष्यातील पिढीसाठी त्यांच्या सुरक्षे साठी संपूर्ण गाव येत्या १५ ऑगस्ट २०२२ ला सर्व पक्षिय पदाधिकारी आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहोत. आमच्या सहनशीलतेचा आता अंत नका पाहू एवढीच आमची सरकारला विनंती आहे. यापूर्वीही या पुला साठी ग्रामपंचायत ते मंत्रालय इथपर्यंत चा प्रवास गावातील ग्रामस्थानी केला आहे. पण सगळे निर्णय सुचना शासन दरबारी फक़्त पेपर वर राहिल्या.

गावचे माजी सरपंच श्री. सुरेश शिंदे - कॉंग्रेस , सचिन कामेरकर विभाग अध्यक्ष मनसे, प्रमोद बेंद्रे माजी ग्रामपंचायत सदस्य, विलास बेर्डे माजी विभाग प्रमुख शिवसेना, हेमंत हेगिष्टे चेअरमन ग्रामीण सोसाइटी, अशोक बेंद्रे आणी अनंत भुजबळराव तंटा मुक्ती अध्यक्ष, मितेश शेनवि भाजपा कार्यकर्ता, राजेंद्र कामेरकर ग्राम पंचायत सदस्य, अमित सक्रे माजी ग्राम पंचायत सदस्य, वैभव कामेरकर, विजय कामेरकर, मंदार कामेरकर, मिलिंद शिंदे माजी ग्राम पंचायत सदस्य, रत्नागिरी जिल्हा बैंक निवृत्त शाखा अधिकारी पवार , संतोष कांबळे यांच्या मार्फत अपर जिल्हा अधिकारी श्री. खान्डेकर साहेब, रत्नागिरी मुख्य अधिकारी जाखड मैडम, रत्नागिरी पोलीस ठाणे मुख्य अधिकारी, आणी इतर शासकीय विभाग मुख्यमंत्री कार्यालय याना उपोषना संदर्भात निवेदन देण्यात आले.

Popular posts
जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल                                       - छगन भुजबळ