दापोलीतील टेनिस क्रिकेटचा हिरा हरपला..*   संघर्ष क्रिडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू कै.योगेश भागणे यांचे आकस्मित निधन 

       


दापोली /लोकनिर्माण  (विशाल मोरे )
    तालुक्यातील श्री.नवतरुण उत्कर्ष  मंडळ,पांगारी भागणेवाडीचे डँशिंग युवा कार्यकर्ते आणि संघर्ष क्रिडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू कै.योगेश शांताराम भागणे यांचे रविवार,दि ८ नोव्हेंबर २०२० रोजी,ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले.  समाजाची उत्तम जाण,सर्वसमावेशक भुमिका, यशस्वी क्रिकेटपटू,सांघिक खेळी, कर्णधार, संघटक अशा विविध भुमिका योगेश भागणे अगदी समरसून जगले.संघर्ष क्रिडा मंडळ भागणेवाडी पांगारीच्या क्रिकेटमधील देदिप्यमान यशाचे श्रेय केवळ यांनाच जाते. संघर्ष संघासाठी त्यांचे खूप मोठे योगदान होते.
कै. योगेश भागणे यांच्या अचानक जाण्याने दापोली तालुका टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरील तारा निखळला अशी भावना क्रिकेटपटूंकडून व्यक्त केली जात आहे. 
आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर ' योगेश भावा ' तुझी आठवण मात्र येत राहिल. अशा श्रद्धांजली संदेशाने तालुक्यातील आणि उन्हवरे विभागातील तसेच अजिंक्य तारा पंचक्रोशीतील तमाम क्रिकेटपटूंनी आपल्या लाडक्या मित्रास शोक व्यक्त केला आहे.
     संघर्ष संघाला प्रत्येक सामन्यात संघर्ष करुन विजय मिळवून देणारा योगेश स्वतः च्या जीवन मरणाच्या प्रवासात मात्र संघर्ष करु शकला नाही. असे दुःख उन्हवरे पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे. कै.योगेश भागणे हे ३० वर्षाचे होते, त्यांच्या पाश्चात्य आई ,वडील, पत्नी व  छोटी मुलगी व एक बहिण असा परिवार आहे.


Popular posts
जनसेवेचे मौल्यवान काम काँग्रेसचे सुधिर शेठ शिंदे सारखेच नेते करू शकतात -अॅड विजयराव भोसले
भारतीय डाक विभागाची अपघाती योजना नागरिकांसाठी शिबिराचे आयोजन
Image
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा* मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार* प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ई पॉस अट शिथिल                                       - छगन भुजबळ
अखंडित दुग्धव्यवसाय करणारा गवळी समाज
Image