सुभाष जाधव यांच्या प्रयत्नाने गिमवी येथे मोफत पोलीस भरती प्रशिक्षण


चिपळूण/लोकनिर्माण  (ओंकार रेळेकर)


     गिमवी येथे गेली चार महीने विना मुल्य कवायत,पोलीस ,आर्मी सारखे प्रशिक्षण  स्वातंत्र्य सैनिक कै महादेव सिताराम जाधव स्मृती महादेव पार्वती उद्यान आयरे यांचे घराजवळ हाॅस्पीटल शेजारी घेतले जात आहे रविवारी दि.२९  रोजी रांगोळी स्पर्धा ही कल्पना श्री समिर सुभाष नार्वेकर व  लतीश साळगावकर यांची  होती आणि ती सत्यात आली आणि जी उपस्थिती  , शिस्त, परीक्षक  आणि गावातील मुले मुली यांचे योगदान वाखाणण्याजोगे होते.


       
      प्रशिक्षण सुरू असताना मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं ही तळमळ इच्छा असेल तर मार्ग मिळेल त्या प्रमाणे रूद्र अकॅडमी मालकांना विनंती आयोजकांनीकेली त्यांनी 30 मुलं /मुली निवडली आज दोन महिने चिपळूण येथे रूद्र अकॅडमीत गिमवी गावातील व पंचक्रोशीतील मुलांना पोलीस व आर्मी प्रशिक्षणदिले जात आहे व सर्व मुल मेहनतीने ट्रेनिंग घेत आहेत 
    चिपळूण अकॅडमी मधुन वेळ काढून आपला कार्यक्रम आपली हजेरी महत्त्वाची हे समजून उपस्थित राहीले तसेच  गावातील व पंचक्रोशीतील सर्व वयोगटातील लोकांनी हजर रहावून स्पर्धक यांचा उत्साह वाढवला
      गावातील व कौडर येतील लोकांनी खुप मेहनत घेऊन रांगोळी स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले विशेष 
आयरे कुटुंबीय TWJ ग्रुप यांचे आभार 
         बक्षिस समारंभ TWJ च्या आरोग्य शिबिरा दिवशी देण्यात येणार आहे.
      कोरोना सारख्या महाभयंकर आधारावर  व देश सेवेचे प्रेम या वर रांगोळी स्पर्धा सुरक्षित अंतर राखून पार पडली.