तिसंगी येथे गावठी दारूची भट्टी उध्वस्त; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त


खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)


    खेड तालुक्यातील तिसंगी येथील जंगलात धाड टाकून खेड पोलिसांनी धगधगणाऱ्या गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी तिसंगी खोपकरवाडी येथील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील तिसंगी खोपकरवाडी येथील जंगलमय परिसरात गावठी दारूच्या भट्ट्या धगधगत असल्याची माहिती खेड पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या बातमीची शहनिशा करून खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित  गडदे, रवींद्र बुरटे, अजय कडू, राहुल कोरे, प्रकाश पवार, रोहित मांगले, अरविंद जमदाडे, राम नागुलवार, शंभाजी मोरपडवार, सचिन जाधव, रुपेश पेडाम्बकर यांच्या सह सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तिसंगी खोपकरवाडी परिसरातील जंगलमय भागात धाड टाकली.
या वेळी त्यांना जंगमय भागात गावठी दारूची भट्टी धगधगत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच हातभट्टी लावणारे तिघेजण जंगलमय भागात पळून गेले. पोलिसांनी धगधगणारी हातभट्टी उध्वस्त करून त्या ठिकाणाहून ३८५ लिटर गावठी दारू, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे सुमारे १०,५०० लिटर रसायन, त्याचप्रमाणे मोठमोठ्या प्लास्टिकच्या टाक्या असा सुमारे ३ लाख तीस हजार, तीनशे पन्नास रुपयांचा महेमल जप्त केला. 
      पोलिसांच्या या कारवाईत दारूची भट्टी लावणारे अजित भोसले,  रोशन भोसले , स्वप्नील भोसले हे सापडले नसले तरी पोलिसांनी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गावठी दारू गाळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image