मुंबई/ लोकनिर्माण प्रतिनिधी
खासगी प्रवासी कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांसाठी वातानुकूलित शयनयान बस सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. या अधिकाऱ्यांमध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचाही समावेश होता. प्रदर्शनात विविध बसचीही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शयनयान बसचा समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.
