अखंडित दुग्धव्यवसाय करणारा गवळी समाज

 

लोक निर्माण/जिल्हा प्रतिनिधी  बाबुराव ढोकणे (हिंगोली)

सुमारे ४०० वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात स्थायीक झालेला गवळी समाज मुळचा मथुरा, वृंदावन, गोकुळ याच परिसरातला असून, मोगल बादशाह औरंगजेब संपूर्ण भारतावर आपला एकछत्री अंमल असावा म्हणून ठिकठिकाणी आपले ( वऱ्हाड ) सैन्य होऊन लढाईसाठी जात होते. तेव्हा त्याच्या सोबत युद्ध मोहिमेवर निघालेल्या सैनिकांसाठी दुध-दुभत्याची गरज असायची त्याची गरज भागविण्यासाठी अनेक गवळी त्याच्या समवेत जात होते, जेव्हा औरंगजेब व शिवाजी महाराजाच्या काळात दक्षिण जिंकण्यासाठी आपल्या प्रचंड सैन्यासह आला तेंव्हा त्यांच्या बरोबर गवळी समाजही मोठ्या प्रमाणात होता. येथे आलेला समाज येथेच राहिला तोच आजचा महाराष्ट्रातील गवळी समाज  राज्यातील मराठवाडा विभागात देवगिरी (दौलताबाद) किल्यावरही औरंगजेबासोबत आलेला समाज काही दिवस राज्य कारभार करत होता, पण त्याचा हटाव का झाला अद्यापही विद्यापीठाच्या इतिहास संशोधन विभागाने माहिती मिळवली नसल्याचे दिसू येते. आज शिक्षण घेतलेल्या समाज बांधवांनी या इतिहासाची माहिती मिळवायला हवी आहे तर त्या संबंधित विभागाने संशोधन करणे गरजेचे आहे. गवळ्याचा हट्टाव का झाला? येथे वास्तव होते काय? कोणत्या   कालखंडात होते असे प्रश्न त्यांनी शोधायला हवी आहेत.



श्री कृष्णाचे वंशज  जपणारे चंद्रवंशी, या दिवशी समाज राज्यातील डोंगर या भागात स्थिरावला असून २० लक्ष संख्येने असलेल्या समाजाची अजूनही शासन दरबारी होरपळ सुरू आहे. वर्षांतील ४ महिने बाहेर गावी भटकती करून आपल्या संसाराचा गाढा ओढावा लागतो. हजारो वर्षांनी राज्य शासनाकडून समाजाच्या संख्येनुसार १९ टक्के आरक्षण दिले. ज्या शासनाला ४२ टक्के आरक्षण लागत असताना तेव्हा  तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडवून आणायला सामाजिक व सांस्कृतिक मागासलेल्या व आर्थिक दृष्टया अडचणीत असलेल्या ओ. बि. सी अनेक जन गुणवत्तेचा योग्य शैक्षणिक स्तर अद्यापही गाठू शकलेला नाही. त्यामुळे आजच्या  स्पर्धेच्या युगात राज्य भरातील विद्यार्थी, व्यावसायिक, शिक्षण क्षेत्र सर्व शासकीय निमशासकीय | सवलती व अव्यालव आरक्षणाच्या कायद्दा ही मिळू शकत नाही. बाळकृष्ण रेणके आयोक केंद्र शासनानी लागू केल्यास भारत भरातील गवळी समाजाची भटकंती थांबू शकेल समाज ही सुधारेल.


जिल्हा प्रतिनिधी बाबुराव ढोकणे (हिंगोली)

गोकुळ अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!