प्रशांत यादव सर्वांना सोबत घेऊन अभिमानास्पद काम करीत आहेत - सुभाष चव्हाण
चिपळूण/लोक निर्माण (जमालुद्दीन बंदरकर)
एकमेकांच्या मदतीने चांगले काम करायचे आहे . पश्चिम महाराष्ट्राचा आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा भविष्यात कोकणात आणि चिपळूणसह दसपटी भागाचा जो पिंपळी भाग आहे, तिथे आपण त्या पद्धतीने शंभर टक्के यशस्वी काम करून वाशिष्ठी डेअरीचे काम प्रशांत यादव करीत आहेत . आज जर पाहिलं, तर कोकणात व्यवसाय, उद्योग करायचा झाल्यास त्याचे श्रेय सर्वसामान्य लोकांना द्यावे लागेल. त्यातला डेअरी उद्योग हा निश्चितपणे थोडासा रिस्क कमी आणि बऱ्यापैकी इन्कम अशा पद्धतीचा आहे. मला खात्री आहे की, आपल्या या संपूर्ण परिसरात आपल्या आजुबाजूच्या तालुक्यातून चांगल्या पद्धतीने या व्यवसायाला आपल्याला संधी मिळेल. आता हा पेट्रोल पंप म्हणजे या परिसरातल्या सगळ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. कारण ज्या पद्धतीने आता पेट्रोल पंपावर पहिल्या टप्प्यात काम झाले आहे, त्या हिशोबाने या पंपाची रचना आणि त्या व्यवस्थेप्रमाणे निश्चितपणे चांगल्या पद्धतीने प्रशांत यादव यांनी काम केले आहे. सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच येथे सर्व अधिकारी उपस्थित आहेत. ते चांगले काम करीत असल्यानेच हे सर्व त्यांच्या प्रेमापोटी एकत्र आले आहेत. भविष्य काळात त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्याचा मला आनंद मिळेल, अशा पध्दतीने यादव साहेब अभिमानास्पद काम करीत आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपण सगळे अगदी मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो, असे सांगून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी प्रशांत यादव यांच्या कार्याचे कौतुक केले.
कामथे येथे स्वामिनी पेट्रोलियमचा शुभारंभ इंडियन ऑईलचे मंडल रिटेल सेल्स प्रमुख सुनिल कांत महाराणा यांच्या हस्ते झाला, तर माजी आमदार रमेशभाई कदम यांनी श्रीफळ वाढविले.
या वेळी चिपळूण नागरीचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, इंडियन ऑईलचे वरिष्ठ व्यवस्थापक आशिषकुमार जैन , माजी जि . प . अध्यक्ष विक्रांत जाधव , माजी सभापती पूजाताई निकम, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी संतोष वाडकर, रत्नागिरीचे असिस्टंट मॅनेजर विशाल झोपे, उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तहसिलदार जयराज सूर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश निगडे , कामथेचे सरपंच डॉ . विजय माटे, भाजप जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, उद्योजक एस . एम . तटकरे , माजी जि . प . सदस्य दिलीप माटे, दादा साळवी, उद्योजक इब्राहिम दलवाई, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, चिपळूण नागरीच्या संचालक स्मिताताई चव्हाण, अॅड . नयना पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, सुधीरशेठ शिंदे, राजूभाई जाधव, जयद्रथ खताते आदी व्यासपिठावर उपस्थित होते. स्वामिनी पंपाचे संचालक प्रशांत यादव यांनी सर्वांचे स्वागत केले. स्वामिनीचे संचालक, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रास्ताविक करताना आपल्याला या प्रकल्पात मदत करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, तसचे विविध कामे पूर्णत्वास नेणारे ठेकेदार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले आपण आज या ठिकाणी आलेला आहात, आपलं सर्वांचे प्रेम चिपळूण नागरी व चव्हाण साहेबांवरती आहे आणि ती आमची खऱ्या अर्थाने ताकद आहे, हीच आम्हाला दैवी प्रेरणा देत असते. यातून आम्हाला नवनवीन घडविण्यासाठी आपण सगळी मंडळी सातत्याने आमच्या पाठीशी असतात आणि त्याच पद्धतीने आपण आम्हाला प्रोसेस करून आजपर्यंत प्रत्येक जडण घडणीमध्ये आमच्या पाठीशी राहिलात, त्यामुळे खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकल्पाचे जरी आम्ही हक्कदार असलो , तरी यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल, तर तो तुम्हा सर्वांचा आहे . आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने आमच्यावर कायम आहेत आणि त्या ऋणात राहून आम्ही आपण टाकलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलण्याचा यापुढे प्रामाणिक प्रयत्न करू. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की, हा आमचा पेट्रोल पंपाचा प्रकल्प आहे, यातून चिपळूण नागरी ज्या पद्धतीने काम करते, तसाच हा प्रकल्प सुद्धा लोकांच्या हितासाठी आणि सातत्याने लोकांना चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने काम करेल, त्यासाठीच आज या ठिकाणी पंपाची उभारणी आम्ही अशा पद्धतीने केली आहे की, आपल्या सर्वांना समाधानान वाटेल. त्याचबरोबर पुढील काळात इथे येणाऱ्या वाहन धारकांना अधिकाअधिक सुविधा कशा मिळतील, त्याचाही आमच्याकडून प्रयत्न राहील. आपण सर्वांनी या आमच्या प्रकल्पाला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आपले प्रेम आमच्या पाठीशी असंच कायम राहू दे , एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो, असे श्री . यादव यांनी सांगितले.
माजी आमदार रमेशभाई कदम म्हणाले, सावर्डेपासून चिपळूणपर्यंतच्या परिसरामध्ये पेट्रोल पंपाची सुविधा नव्हती आणि म्हणून या गावचे प्रथम नागरिक डॉ . विजयशेठ माटे यांनी सहकार्य केल्यामुळे या कामाथेसारख्या गावामध्ये आज प्रशांत यादव हा पेट्रोल पंप या ठिकाणी सुरू करू शकले . प्रशांतच्या यशामागे आदरणीय चव्हाण साहेबांचे आशीर्वाद हे निश्चितपणे लाभल्याचे अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून त्या ठिकाणी मी पाहिलेले आहे .. प्रामुख्याने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून चव्हाण साहेबांनी त्यांना मोलाच सहकार्य केले आहे. त्यामुळे विविध नि व्यवसायामध्ये ही मंडळी अत्यंत चांगल्याप्रकारे पत्येक ठिकाणी यशस्वी होऊ शकली. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पिंपळीसारख्या गावामध्ये डेअरी प्रकल्पाचा शुभारंभ केला. मुंबईकर सुद्धा कोल्हापूरमार्गे गोव्याला जातात, परंतु ती सर्व आता चौपदरी झाल्यानंतर या मार्गाने गोव्याला जातील आणि भविष्यामध्ये या महामार्गावरची वाहतूक निश्चितपणे वाढणार आहे, असे सांगितले.
या वेळी डॉ. विजय माटे, रामदास राणे, प्रांत प्रविण पवार , डीवायएसपी सचिन बारी, माजी सभापती पूजाताई निकम, माजी जि . प . अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या .
या वेळी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्व ठेकेदार, चिपळूण नागरीचे अधिकारी व कर्मचारी, सर्व संचालक, पेट्रोलियम असोसिएशनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक स्वामिनी यादव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, चिपळूण नागरीचे संचालक अशोकराव कदम, सौ . स्मिताताई चव्हाण, सोमा गुडेकर, राजेश वाजे , सत्यवान म्हामुणकर, गुलाब सुर्वे, अॅड. नयना पवार, रविंद्र भोसले, राजेंद्र पटवर्धन, गुलाब सुर्वे, अशोक साबळे, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र सुर्वे, माजी नगरसेवक सुरेशशेठ राऊत, बिकी नरळकर, करामत मिठागरी , कदम , मिलिंद कापडी, शिरीष काटकर, अरूण भोजने, रमेश खळे , रतन पवार राजूशेठ गद्रे, राम रेडीज , काँग्रेसचे लियाकत शाह, फैसल पिलपिले, राकेश दाते, निर्मला जाधव, श्रद्धा कदम, अश्विनी भुस्कुटे, रविना गुजर, राजूभाई जाधव, जयंद्रथ खताते, जयंत शिंदे, सुनिल सावर्डेकर, अन्वर जबले, माजी जि . प . सदस्या दिशा दाभोळकर, अरविंद आंब्रे, संजय जाधव, सुरेश कांबळे, विनोद भुरण, दशरथ दाभोळकर, रियाज खेरटकर आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले.