धारावीत रोजगार मेळाव्यात उत्तम प्रतिसाद !


मुंबई/ लोकनिर्माण ( विलास देवळेकर)



नुकताच शनिवारी १४ जानेवारी २०२३ रोजी महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धारावी विधानसभा क्षेत्र व होप फाऊंडेशन यांच्यावतीने धारावी व आजूबाजूच्या विभागातील बेरोजगार युवक व युवतींचा निशुल्क भव्य  रोजगार मेळाव्यास उत्पुर्सुद प्रतिसाद मिळाला आहे. स. १० ते ४ यावेळेत धारावी व आजूबाजूच्या विभागातील बेरोजगार युवक - युवती सहभागी झाले होते. नोकरी मिळविण्याची ही नामी संधी असून, या भव्य रोजगार मेळाव्यात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्या बेरोजगार युवक-युवतींची शैक्षणिक कागदपत्रे तपासून, उत्तम पगाराची डायरेक्ट नियुक्ती  देण्यात आली असून, इ. ७ वी पासून पुढे कोणत्याही शाखेतील पदवीधर या रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यात Kristal , ISS World, E-Scan, Drivers in India, Quess Corp Limited, Impact Guru, Tata Aia Life, १ point, Peons, Helps यांच्यासह अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या ८४९९ पदांसाठी सदर नामांकित कंपन्या या मेळाव्यात साडेसहाशेच्या वर सहभागी झाले होते. आणि त्यातील पावणे दोनशे सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्ती रोजगार पत्रक देण्यात आले. आणि अजून काहींना, या संधीचा विभागातील बेरोजगार युवक-युवतींना याचा फायदा होणार आहे. असे महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री. बाबुरावजी माने व होप फाऊंडेशनचे संचालक वर्ग यांनी सांगितले आहे.