सौ. पूनम खरे अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह जिऑग्राफि टिचर अवॉर्ड 2022' पुरस्काराने सन्मानित


संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी 

    तालुक्यातील कसबा हायस्कूलमधील शिक्षिका सौ. पूनम संतोष खरे यांना २०२२ सालचा 'अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह जिऑग्राफि टिचर अवॉर्ड 2022' या शैक्षणिक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बसवलेल्या आदिवासी नृत्याला उत्कृष्ट नृत्य म्हणून रोख स्वरूपात पारितोषिक मिळाले होते.  यापूर्वी सौ.पूनम खरे यांना जागतिक महिला दिनानिमित्त काळण समाज पुरस्काराने पनवेल येथे सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्या लोकनिर्माण या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादिका म्हणून काम करत असून त्या लोकनिर्माण या निर्भीड वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांच्या कन्या आहेत.

त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Popular posts
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
राजापुरात प्रकाश कातकर यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image